IMPIMP

Winter Session 2022 | भुखंड घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी मागितला मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा…

by nagesh
 CM Eknath Shinde | The government will take a positive decision on the demand for salary hike of 'Umed' employees - Chief Minister Eknath Shinde

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) कर्नाटक सीमाप्रश्न, महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेल्या कामांना विद्यमान सरकारने दिलेली स्थगिती या कारणांमुळे चांगलेच तापले. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका भूखंड घोटाळ्यात राजीनामा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. यावर मुख्यमंत्री यांनी विरोधकांना सभागृहात उत्तर दिले आहे. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखन केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ठाकरे सरकारच्या काळात विद्यमान मुख्यमंत्री हे नगरविकास मंत्री होते. यादरम्यानच त्यांनी 86 कोटींचा भूखंड अवघ्या 2 कोटींना दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. शिंदेंच्या या निर्णयानंतर कोर्टाने शिंदे यांच्यावर ताशेरे ओढले. त्यामुळे या प्रकरणावरून विरोधकांनी शिंदेच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

तर यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री शिंदेंची पाठराखन करत हा भूखंडाचा विषय नाही, हा गुंठेवारीचा आहे. 17 जुलै 2007 रोजी विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला होता. 49 लेआऊटपैकी 16 शिल्लक राहिले. यात 2009 आणि 2010 साली देखील शासन आदेश निघाला असा दावा फडणवीस यांनी केला.

 

तसेच यादरम्यानच्या काळात एक जनहित याचिका कोर्टात दाखल झाली. त्यावर न्यायालयाने एक समिती गठीत केली. पण यावेळी मंत्र्यांना न्यायालयीन वस्तुस्थिती लक्षात आणून द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही. मंत्र्यांनी त्यामुळे निर्णय दिला. आणि त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदविले. असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्याचबरोबर न्यायालयाने कुठेही ताशेरे ओढलेले नाहीत. जर वृत्तपत्रात आलेली बातमी खरी असेल तर स्थिती ‘जैसे थे’ राखण्यात यावी, असे सांगितले. 16 भूखंड नियमितीकरण रद्द करून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. न्यायालयाने सांगितलेली कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे, असही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Winter Session 2022 | chief minister eknath shinde accused of plot scam opposition demanded his resignation

 

हे देखील वाचा :

Electricity Theft In Pune Wagholi | वाघोलीत पकडल्या मोठ्या वीज चोऱ्या; दोन घटनेत 1 कोटी 44 लाखाची वीजचोरी उघडकीस

Mini Olympic Competition | मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव देशपातळीवर पोहोचविण्याची संधी – विभागीय आयुक्त सौरभ राव

Shraddha Walker Murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालावावे, केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती करणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

Love Jihad Law | महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद कायदा’ होणार? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात मोठे विधान

 

Related Posts