IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा ‘थरार’; दुचाकीवरुन आलेल्या गुंडांनी झाडल्या 6 गोळ्या, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Metro | A shooting took place at the Metro shed during Army training, injuring a Metro employee

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime | निलेश गायकवाड (Nilesh Gaikwad) व त्याच्या साथीदारांनी एकाच्या कारवर  शिवणे येथे गोळीबार (Firing) करण्याची घटना घडली आहे. शिवणे स्मशानभूमी ते एनडीए रोडवर (NDA Road) रविवारी रात्री पावणेदहा वाजता हा थरार रंगला होता. त्यात एक गोळी पाठीला लावून केदार भालशंकर जखमी (Pune Crime) झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी केदार शहाजी भालशंकर (वय २४, रा. रामनगर, वारजे – Ram nagar Warje) याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन निलेश गायकवाड व त्याच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार भालशंकर व त्याचे मित्र हर्षवर्धन मोहिते व आकाश शिंदे हे कारमधून रविवारी रात्री पावणेदहा वाजता घरी जात होते. यावेळी शिवणे स्मशान भूमी ते एनडीए रोड दरम्यान निलेश गायकवाड व त्याचे तीन ते चार साथीदार 3 दुचाकीवरुन आले. त्यांनी भालशंकर याच्या गाडीचा पाठलाग करुन त्यांच्यावर फायरिंग केले. त्यातील एक गोळी भालशंकर याच्या पाठीला लागून तो गंभीर जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून रस्त्यावरच्या लोकांचे लक्ष तिकडे गेल्यावर रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍या लोकांना या गुंडांनी पळवून लावून दहशत निर्माण केली.

 

या घटनेची माहिती मिळाल्यावर उत्तमनगर, वारजे माळवाडी पोलीस (Warje Malwadi Police)
ठाण्याचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली असून उत्तमनगर पोलीस ठाण्यात खुनाचा
प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मांडवी खुर्द येथील सरपंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी धमकाविल्याच्या
प्रकरणात केदार भालशंकर याच्यावर उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) गुन्हा दाखल केला होता.

 

Web Title : pune crime firing incident in uttam nagar area of pune

 

हे देखील वाचा :

Anti Corruption | बारामतीमध्ये कर्मचार्‍याकडून लाच मागणार्‍या उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

Maruti Alto वर मिळत आहे 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट! जाणून घ्या पूर्ण डिटेल

LIC Jeevan Akshay | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आयुष्यभर मिळतात पैसे, जाणून घ्या अटी

 

Related Posts