IMPIMP

LIC Jeevan Akshay | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आयुष्यभर मिळतात पैसे, जाणून घ्या अटी

by nagesh
lic jeevan akshay pension plan for life time annuity benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Jeevan Akshay | जर दर महिना पेन्शनची व्यवस्था आतापासूनच करायची असेल तर यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) ‘जीवन अक्षय’ (Jeevan Akshay) पॉलिसीत गुंतवणूक करू शकता. या पॉलिसीत एकरकमी गुंतवणूक करून दरमहिना एक निश्चित पेन्शन (get a fixed pension every month) मिळवू शकता. विशेष म्हणजे ही पेन्शन पॉलिसीधारकाला आयुष्यभर मिळते.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

या पॉलिसीत पेन्शन मिळवण्यासाठी 10 वेगवेगळे पर्याय आहे. यापैकी एक पर्याय Annuity payable for life at a uniform rate (प्रति महिना पेन्शन पर्याय ‘अ’) असून यामध्ये आयुष्यभर पेन्शन मिळते.

यासाठी कोणत्या अटी आहेत ते जाणून घेवूयात :-

– 30 ते 85 वर्षाच्या कुणीही भारतीय व्यक्ती गुंतवणूक करू शकतो.

– किमान एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक अनिवार्य.

– कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही

– वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही आणि मासिक आधारावर पेन्शन.

– पॉलिसी जारी करण्याची तारीख 3 महिन्यानंतर लोन सुविधा.

– एकाच कुटुंबातील कुणीही दोन सदस्य जॉईंट एन्यूटी घेऊ शकतात.

– किमान वार्षिक पेन्शन 12 हजार रुपये ठरली आहे.

 

 

अशी मिळवू शकता दरमहिना 2 हजार रुपये पेन्शन :-

वय : 45

सम एश्युअर्ड : 400000

एकरकमी प्रीमियम : 407200

पेन्शन :

वार्षिक : 24840

अर्धवार्षिक : 12220

तिमाही : 6060

मासिक : 2010

 

Web Title : lic jeevan akshay pension plan for life time annuity benefits

 

हे देखील वाचा :

Pooja Chavan Suicide case | मद्यप्राशन करून पूजा चव्हाणने केली आत्महत्या, ‘या’ अहवालातून बाब समोर?

Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास

Pune Metro | ‘पुणे मेट्रोची ‘ट्रायल रन’ कोणाच्याही हस्ते होऊ द्या, उद्घाटन PM मोदींच्या हस्तेच होणार’

 

Related Posts