IMPIMP

Pune Crime | रंग कामातील तोटा भरुन काढण्यासाठी केल्या जबरी चोऱ्या; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या, 7 गुन्हे उघडकीस

by nagesh
Pune Crime | Forcible thefts to compensate for losses in paint work; Pune Police Crime branch broke the shackles, 7 crimes were revealed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यात जबरी चोरी (Robbery) करणाऱ्या परराज्यातील दोघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने
(Pune Police Crime Branch) अटक (Arrest) केली आहे. रंग कामातील तोटा भरुन काढण्यासाठी गुन्हेगारी क्षेत्रात येऊन चोरी केल्याचे तपासात
निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 7 गुन्हे उघडकीस आले असून 2 लाख 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल (Pune Crime) जप्त केला आहे.

 

राज अंगनुराम गौतम Raj Anganuram Gautam (वय-26 रा. कात्रज, मुळ रा. किराकत, जि. जोनपुर, उत्तरप्रदेश), विजय शिवमुरत राम कुमार
Vijay Shivmurat Ram Kumar (वय-20 रा. गोकुळनगर,कात्रज, मुळ रा. मिझापुर छपरा, जि. गाझीकुर, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या
आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेने ही कारवाई अलंकार पोलीस स्टेशनच्या (Alankar Police Station) हद्दीत केली. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार यांना राम मोबाईल शॉपी
दुकानासमोर दोन जण उभे असून ते चोरीचे मोबाईल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात
घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये 12 मोबाइल हॅन्डसेट आढळून आले. आरोपींकडून 12 मोबाइल आणि गुन्ह्यात
वापरलेली दुचाकी असा एकूण 2 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

आरोपींनी अलंकार, कोंढवा (Kondhwa Police Station), सिंहगड रोड (Sinhagad Road Police Station), चतु:श्रृंगी (Chaturshringi Police Station), हिंजवडी (Hinjewadi Police Station), वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासासाठी आरोपींना अलंकार पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप (PSI Gunga Jagtap),
पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, सुजीत पवार, संजिव कळंबे,
प्रताप पडवाळ, राकेश टेकावडे, ज्ञानेश्वर चित्ते, साईनाथ पाटील, दिपक क्षिरसागर, सतिश कत्रांळे,
गणेश शिंदे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Forcible thefts to compensate for losses in paint work; Pune Police Crime branch broke the shackles, 7 crimes were revealed

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार, लातूरच्या मंगेश पटणेविरूध्द पुण्यात FIR

Pune Crime | कोर्टाच्या केसमध्ये जामीन राहण्यास सांगून दुकानात शिरुन केली तोडफोड; कुणाल लोणकर, साईराज लोणकरसह 8 जणांविरूध्द कोंढव्यात FIR

Pune PMC Water Supply | गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

 

Related Posts