IMPIMP

Pune Crime | कोर्टाच्या केसमध्ये जामीन राहण्यास सांगून दुकानात शिरुन केली तोडफोड; कुणाल लोणकर, साईराज लोणकरसह 8 जणांविरूध्द कोंढव्यात FIR

by nagesh
Pune Crime News | Pune: Extortion demand of 30 lakhs from builder, case against three in Kondhwa police station

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कोर्टाच्या केसमध्ये (Court Case) जामीन होण्यास तसेच ५ हजार रुपयांची खंडणी (Ransom)
देण्यास नकार दिल्याने गुंडाने ७ ते ८ साथीदारांसह दुकानात शिरुन तोडफोड केली. कांऊटरमधून १ लाख ८७ हजार ५०० रुपये जबरदस्तीने चोरुन
नेले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) दरोड्याचा गुन्हा (Robbery Case) दाखल करुन सराईत गुंडाला अटक केली आहे. (Pune
Crime)

 

याबाबत मंगेश उत्तम लोणकर Mangesh Uttam Lonkar (वय ३४, रा. यशोदा मिनी मार्केट, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa
Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७३३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कुणाल राणाप्रताप लोणकर (Kunal Ranapratap Lonkar),
साईराज राणाप्रताप लोणकर Sairaj Ranapratap Lonkar (वय २३, रा. कोंढवा) व त्याच्या ७ ते ८ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. साईराज
लोणकर याला अटक केली आहे. हा प्रकार कोंढव्यातील यशोदा मिनी मार्केटमध्ये शनिवारी दुपारी सव्वा चार वाजता घडला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल लोणकर हा फिर्यादी मंगेश लोणकर यांच्या भावकीतील आहे. मंगेश हे दुकानात असताना कुणाल, साईराज व त्याचे साथीदार दुकानात आले. त्यांनी फिर्यादीस कोर्टाचे केसमध्ये जामीन होण्याचा आग्रह करुन ५ हजार रुपयांची मागणी केली. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. त्याचा राग मनात धरुन त्यांनी लाकडी दांडकी घेऊन दुकानात शिरले. दुकानातील कामगार भीमराव गैदंम याला मारहाण करुन २ टी व्ही फोडले. काऊंटरमधील १ लाख ८७ हजार ५०० रुपये जबरदस्तीने चोरले. तसेच येणार्‍या जाणार्‍या लोकांना भिती दाखवून आरडा ओरडा करुन दहशत पसरविली. कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Vandalized shop by asking for bail in court case; FIR against 8 persons including Kunal Lonkar, Sairaj Lonkar in Kondhwa police station

 

हे देखील वाचा :

Pune PMC Water Supply | गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

Jammu Kashmir Grenade Blast | जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ ग्रेनेड स्फोटात 2 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू

Shivsena | नवनियुक्त शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच ‘या’ कारणामुळे राजीनामा

 

Related Posts