IMPIMP

Pune Crime | ‘आयुष’ मंत्रालयाचा संदर्भ देऊन 23 कोटी 45 लाखांची फसवणूक; पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ऋषिकेश पाटणकरला अटक

by nagesh
Pune Crime | 21 kg cannabis seized from Pune Police Crime Branch Anti-Narcotics Cell, one arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | शतावरी आणि अश्वगंधा या औषधी वनस्पतींची शेतात लागवड करुन येणारे पिक एकरी ३ लाख रुपये मोबदला देऊन विकत घेण्याचे आश्वासन देऊन तसेच गुंतवणुकदारांना आयुष मंत्रालयाचा (ministry of ayush) संदर्भ देऊन गुंतवणुक करण्यास भाग पाडून २३ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेतील आर्थिक गुन्हे शाखेने (economic offences wing) एकाला अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर Rishikesh Laxman Patankar (वय ३८, रा. आकाशदीप सोसायटी, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शहा (वय ४६, रा. जयराज किरण सोसायटी, वाळवेकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटणकर याने तीन वर्षांपूर्वी एका अ‍ॅग्रो कंपनीची (Agro Company) स्थापना केली. त्याने असंख्य शेतकरी आणि गुंतवणुकदार यांना शतावरी आणि अश्वगंधा या औषधी वनस्पतीची त्यांचे शेतात लागवड करावी. येणारे पिक स्वत: विकत घेऊन त्यांना दरवर्षी एकरी ३ लाख रुपये मोबदला देण्याचे आमिष दाखविले. तसेच आयुष मंत्रालयाचा संदर्भ देऊन त्यांच्या कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. अशा प्रकारे असंख्य शेतकरी आणि गुंतवणुकदार यांची सुमारे २३ कोटी ४५ लाख १ हजार ९९४ रुपयांची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेने ऋषिकेश पाटणकर याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सहाणे अधिक तपास करीत आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : Pune Crime | Fraud of Rs 23 crore 45 lakh with reference to AYUSH Ministry; Rishikesh Patankar arrested by Pune Economic Crimes Branch

 

हे देखील वाचा :

Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसलेचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! SBI च्या ‘या’ सर्व्हिसद्वारे घसरबसल्या मिळतील ‘या’ सर्व सुविधा; जाणून घ्या

Weather Alert | हवामान विभागाचा अलर्ट ! 18 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये होईल जोरदार पाऊस, ‘वीज’ कोसळण्याची शक्यता

 

Related Posts