IMPIMP

Pune Crime | बेटिंगसाठी दिलेले पैसे परत न केल्याने गुंडांनी तरुणाचा केला खून; आंबेगावमधील घटना

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | बेटिंगसाठी दिलेले पैसे परत न केल्याने दोघा गुंडांनी तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण करुन त्याचा खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) दोघा गुंडांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

विशाल अमराळे (वय ३५) आणि लहु माने (वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर निखील ऊर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय ३२, रा. आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे़. याबाबत हर्षदा निखील अनभुले (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे (गु. रजि. नं. ७८०/२२) दिली आहे. ही घटना फ्लाइंग बर्ड स्कुल आंबेगाव ते बिबवेवाडीतील के के मार्केट दरम्यान १५ नोव्हेबर रोजी रात्री साडेदहा ते १६ नोव्हेबर पहाटे पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान घडली होती. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील अनभुले यांनी विशाल अमराळे याच्याकडून बेटिंगसाठी २८ हजार रुपये घेतले होते. ते परत देण्यासाठी अमराळे याने त्यांना वारंवार फोन करुन धमकाविले होते.
आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगून धमक्याही दिल्या होत्या. तरीही निखील याने पैसे परत केले नव्हते.
त्यामुळे १५ नोव्हेबर रोजी त्याने निखील याला आंबेगाव येथील फ्लाइंग बर्ड स्कुल येथे बोलावून घेतले.
तेथून अमराळे व त्याच्या साथीदाराने त्याचे अपहरण करुन त्याला के के मार्केट येथे आणून कोंडून ठेवले.
त्याच्या पाठीवर, छातीवर कशाने तरी जबर मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले.
त्यात निखील याचा मृत्यु झाला. निखील याच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना मिळाला.
त्यात मारहाण केल्याने मृत्यु झाल्याचे नमूद केले असल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut Tweet | ‘मग त्यांनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली का वाहिली नाही?’ चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना सवाल

Girish Mahajan | ‘खडसेंच्या मुलाची आत्महत्या की खून?’ तपासण्याची गरज, गिरीश महाजनांचे खळबळजनक विधान

Sanjay Raut | 50 रेडे गुवाहाटीला चालले म्हणणार्‍या संजय राऊतांना शिंदे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले…

 

Related Posts