IMPIMP

Pune Crime | गुंडांच्या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना; कळस आणि कोंढव्यात वाहनांची केली तोडफोड

by nagesh
Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आपल्या टोळीचे वर्चस्व दाखविण्यासाठी व परिसरात दहशत पसरविण्यासाठी गुंडांच्या टोळक्यांनी
रस्त्यावर पार्क केलेल्या नागरिकांच्या वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) करण्याचे सत्र काही काळापूर्वी पुण्यात दिसून येत होते. हा प्रकार
पुन्हा एकदा समोर आला आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीतील कळस (Kalas)आणि कोंढव्यातील
शिवनेरीनगर (Shivneri Nagar, Kondhwa) अशा दोन ठिकाणी एकाच दिवशी टोळक्यांनी वाहनांवर दगडफेक करुन कोयत्याने काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी सोमनाथ शंकर भगत (वय ४२, रा. कळस गाव) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम खैरे, ऋषीकेश खैरे व त्याच्या ७ ते ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ भगत यांनी घरासमोर आपली रिक्षा पार्क केली होती. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास खैरे व त्याचे साथीदार हातात कोयते घेऊन येथे आले. त्यांनी मोठमोठ्या शिवीगाळ करीत “कोणमध्ये येतो त्याला बघतोच माझेसमोर या खल्लास करतो, जिवंत सोडणार नाय” असे बोलून फिर्यादी यांच्या रिक्षाची काच फोडून नुकसान केले. तसेच परिसरातील लोकांच्या १० ते १२ दुचाकीवर लाकडी दांडके, कोयते मारुन नुकसान केले. (Pune Crime)

 

 

दुसरा प्रकार कोंढव्यातील (Kondhwa News) शिवनेरीनगर येथील डी पी रोडवर रविवारी रात्री दहा वाजता घडला.
याप्रकरणी मल्हारी हरीभाऊ पवार (वय ५२) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तीन दुचाकीवरुन सहा जणांचे टोळके हातात कोयते लाठ्या काठ्या घेऊन आले.
त्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेले फिर्यादी यांचे चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले.
तसेच इतर लोकांचे ५ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. कोयते व काठ्या हवेत फिरवून आमच्या नादाला लागला तर संपवून टाकू अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.
आपले वर्चस्व दाखविण्यासाठी सामान्यांच्या वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार शहरात पुन्हा सुरु झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Pune Crime | Goons carrying lethal weapons damage vehicles in Kalas Vishrantwadi and Shivneri Nagar Kondhwa area, terrorise citizens

 

हे देखील वाचा :

Ileana D’cruz Oops Moment | इलियाना डीक्रूजने परिधान केला ‘इतका’ ट्रान्सपरंट ड्रेस अभिनेत्री झाली Oops Moment ची शिकार

Pune Crime | अजित पवार यांच्यानंतर PCMC आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने मागितले पैसे

Nana Patole | ‘गावगुंड मोदीला पकडण्यात आलंय, त्यानच मला पाडण्याचा प्रयत्न केला होता’ – नाना पटोले

 

Related Posts