IMPIMP

Pune Crime | घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घृण खून

by nagesh
https://policenama.com/pune-crime-murder-of-a-woman-who-refuses-to-have-an-affair-the-accused-fled-after-throwing-the-body-in-the-bathroom-in-lohegaon-of-vimannagar-police-station-limits/

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन घरगुती वादातून (Domestic Dispute) पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण खून (Wife murder) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी पिंपरी पोलिस ठाण्याच्या (Pimpri Police Station) हद्दीतील नेहरुनगरमध्ये घडली. पत्नीचा खून केल्यानंतर (Pune Crime) आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

जिनाब अजमुद्दीन चाकोरे Jinab Azamuddin Chakore (वय-35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अजमुद्दिन
अल्लाउद्दीन चाकोरे (वय-38 रा. नेहरुनगर पिंपरी) याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जिनाब आणि आरोपी अजमुद्दीन यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबीक वाद सुरु होते. याच वादातून आरोने आज सकाळी जिनाब यांच्या डोक्यात पाटा घालून खून केला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जिनाब यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू (Pune Crime) झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पुढील तपास पिंपरी पोलीस (Pimpri Police) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | husband kill his wife using stone in pimpri chinchwad pimpri police arrest husband

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला 5 लाखाच्या खंडणीची मागणी; 4 लाख घेताना तिघांना खंडणी विरोधी पथकानं पकडलं

High Court | लहान मुलांसोबत ‘ओरल सेक्स’ गंभीर गुन्हा नाही – उच्च न्यायालय

Pune Crime | पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे पलायन

 

Related Posts