IMPIMP

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला मार्केटयार्ड पोलिसांकडून अटक

by nagesh
Burglary

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | घरफोडी करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलीस पथकावर आणि सोसायटीच्या वॉचमनवर दगड, विटा फेकून तसेच पोलिसांना कोयता मारुन पळून गेल्याचा प्रकार पुण्यातील (Pune Crime) मार्केटयार्ड परिसरात (Market Yard Area) घडला होता. आरोपींवर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना मार्केटयार्ड पोलिसांनी अतिशय शिताफिने अटक (Arrest) केली. ही कारवाई पर्वती (Parvati) येथील जनता वसाहत कॅनॉलवर (Janata Vasahat) करण्यात आली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नवलसिंग अजम अलावा (वय – 40), भाया भांगु देवका (वय – 32). विनोद रमेश सिसोदिया (वय – 19 तिघे रा. नरवाली, तहसील कुकशी, जि. धार राज्य मध्यप्रदेश – Madhya Pradesh) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या (Market Yard Police Station) हद्दीत घरफोडीचा (Burglary) करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांच्या अंगावर दगड, विटा तसेच कोयता फेकून मारुन अंधाराच्या दिशेने पळून गेले होते. आरोपी हे जनता वसाहत येथे गेल्याचे दिसून आले होते. (Pune Crime)

 

आरोपींना पकडण्यासाठी पोलीस दिवस – रात्र त्यांच्यावर पाळत ठेवून होते. दरम्यान आरोपी हे जनता वसाहत येथील कॅनॉलवर आल्याचे दिसून आले. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडी करण्यासाठी वापरलेली हत्यारे लोखंडी कटर, स्क्रु ड्रायव्हर, लोखंडी पाना, टॉमी तसेच 30 हजार रुपये किमतीचे सोन्या – चांदीचे दागीने (Gold-Silver Jewelry) जप्त केली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan)
यांच्या सूचनेनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे (Senior Police Inspector Anagha Deshpande),
पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे (Police Inspector Savita Dhamdhere)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे (API Madan Kamble),
पोलीस अंमलदार हिरवाळे, किरण जाधव, महेश जाधव, आशिष यादव, स्वप्नील कदम, संदीप सुर्यवंशी, लोणकर, गायकवाड, शेख, घुले यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Interstate burglary gang arrested by Marketyard police

 

हे देखील वाचा :

Re – registration of vehicles | एक एप्रिलपासून बदलणार आहेत नियम, जुन्या कारचा तुमच्या खिशावर पडणार 7 पट जास्त भार; जाणून घ्या कसा ?

Men’s Interest In These Type Of Girls Never Ends | पुरूषांचा ‘या’ प्रकारच्या मुलींमधला रस कधीच कमी होत नाही, वाचा सविस्तर

Jitendra Awhad | ‘मुंबईला अंडरवर्ल्डपासून शरद पवारांनी वाचवलं’; PM नरेंद्र मोदींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

 

Related Posts