IMPIMP

Pune Crime | पतीनेच दीराबरोबर संबंध ठेवायला सांगितले; नकार दिल्याने विवाहितेला केली मारहाण, हडपसर परिसरातील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime News | A shocking incident in Moshi where the owner of the house was brutally beaten and molested after paying the house rent

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | सासरी छळ होत असतानाच पतीने आपल्या पत्नीला दिराबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवायला सांगितले. त्याला नकार दिल्याने विवाहितेला मारहाण (Beating) केली. त्याचा जाब विचारण्यास आलेल्या तिच्या आईचा विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी हडपसर येथील एका ३३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४०५/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिचे पती, दीर व सासुवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील शिंदे वस्ती येथील सोसायटीत ७ मे २०१७ ते १० नोव्हेबर २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर सासरकडील लोकांनी संगनमत करुन फिर्यादी यांना घरातील काम व्यवस्थित येत नाही म्हणून शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.
तिच्या पतीने दिराबरोबर शारीरीक संबंध ठेव, असे सांगितले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला.
तेव्हा त्याने तिला मारहाण केली. ही बाब तिने आपल्या आईला सांगितली.
तेव्हा त्याचा जाब विचारण्यासाठी विवाहितेची आई वडिल गुरुवारी त्यांच्या घरी आले होते.
त्यावेळी त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. आईचा विनयभंग केला.
तसेच वडिलांच्या करंगळीजवळ चाकून मारुन त्यांना जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक डांगे
(Assistant Police Inspector Dange) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | It was the husband who asked to have a relationship with Brother in law ; Married woman beaten up for refusing, incident in Hadapsar area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 31 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपींना अंतरिम जामीन मंजूर

Pune Crime | पोलिसांत तक्रार देण्यासाठी जाणार्‍या पत्नीच्या गळ्यावर केले सपासप वार; पर्वतीमधील शिवदर्शन येथील घटना

Sanjay Raut | अटकेची घाई, सुनवाई मात्र नाही; विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशाची ईडीवर टीका

 

Related Posts