IMPIMP

Sanjay Raut | अटकेची घाई, सुनवाई मात्र नाही; विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशाची ईडीवर टीका

by nagesh
Sanjay Raut | special pmla court slams ed in sanjay raut bail said ed arrests accused at extraordinary pace but conducts trial at snails pace

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनावर सुनावणी (Bail) करताना कोर्टाने अंमलबजावणी संचालनालय
अर्थात ईडीला (ED) जोरदार फटकारलं आहे. “ईडीला फक्त अटकेची घाई असते. परंतु विशेष पीएमएलए कोर्ट (PMLA Court) स्थापन झाल्यापासून
आरोपपत्र आणि आरोप निश्चिती करुन एकाही प्रकरणाची सुनावणी झालेली नाही, याची नोंद घेत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे (M G
Deshpande) यांनी ईडीला सुनावले आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात आरोपींना तातडीने अटक करता, परंतु खटले संथ गतीने चालतात, या ईडीच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका त्यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपल्या आदेशात न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी नमूद केले, “मी सध्या अध्यक्ष असलेल्या न्यायालयासमोर स्थापन झाल्यापासून एकही खटला पूर्ण झालेला नाही आणि याचं श्रेय ईडीला जाते.
ईडीने पुराव्यांद्वारे निष्कर्ष काढला आहे आणि न्यायालयाला गेल्या दशकापासून एकही निर्णय देता आलं नाही.
कोर्टाच्या स्थापनेपासून आणि माझ्या संपूर्ण कार्यकाळात एकही निर्णय झालेला नाही.”

 

“ईडीला केवळ पीएमएलएचे कलम १९ (कोठडी) आणि ४५ (जामीन) माहित आहेत असं दिसतं.
परंतु पीएमएल कायद्याच्या कलम ४४ नुसार गुन्ह्याचा खटला चालवण्याची तरतूद आहे हे ईडी (ED) विसरली आहे.
पीएमएलए विशेष प्रकरणांमध्येही पुरावे नोंदवावे लागतात, खटले चालवावे लागतात आणि निवाडे द्यावे लागतात
हे ईडी विसरत आहे, जे दुर्दैवी आहे,” असं न्यायाधीशांनी आदेशात नमूद केलं.

 

Web Title :- Sanjay Raut | special pmla court slams ed in sanjay raut bail said ed arrests accused at extraordinary pace but conducts trial at snails pace

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | संजय राठोड प्रकरणावर आता पडदा टाकुयात – चित्रा वाघ

Chandrakant Khaire | संजय राऊतांच्या सुटकेसाठी चंद्रकांत खैरे यांचे थेट देवांच्या कायदामंत्र्याला साकडे

Mumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेन समोर नवीन अडथळा, गोदरेज कंपनीचे राज्य सरकार विरोधात प्रतिज्ञापत्रMumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेन समोर नवीन अडथळा, गोदरेज कंपनीचे राज्य सरकार विरोधात प्रतिज्ञापत्र

Jacqueline Fernandez | आता न्यायालयाकडून ही ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; “जॅकलिनला अद्याप अटक का नाही?”

 

Related Posts