IMPIMP

Pune Crime | अनैसर्गिक संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वकिलाने तरुणाला लुबाडले; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime | Lure girlfriend money with porn star fame; Friends made video circulating on porn sites, shocking scenes from Pune's Warje Malwadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | सोशल मीडियावर (Social Media) झालेल्या ओळखीतून तरुणाला भुरळ पाडुन त्यांच्याबरोबर
अनैसर्गिक संबंध (Unnatural Relationship) प्रस्थापित करुन त्याचे फोटो व्हायरल (Photo Viral) करण्याची धमकी (Threat) देऊन जबरदस्तीने
कर्ज (Loan) घेण्यास लावून त्या पैशांचा अपहार करुन फसवणूक (Fraud Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी आंबेगाव गावठाण येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६३०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दशरथ बावकर Dasaratha Bawkar (वकील) (वय २७, रा. ताथवडे) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हाप्रकार आंबेगाव गावठाण, तसेच विविध ठिकाणी जानेवारी २०२२ ते २५ सप्टेबर दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दशरथ बावकर यांची फेसबुकवरुन
(Facebook) ओळख झाली. दशरथ याने फिर्यादीशी गोड बोलून त्याला भुरळ पाडली.
फिर्यादीसोबत विविध ठिकाणी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले.
त्याचे नग्न फोटो काढून ही बाब कोणाला सांगितली तर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादीच्या कुटुंबियाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ७ लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने फिर्यादीच्या आईस तुमच्या मुलाला मायग्रेशनचा आजार आहे,
असे खोटे सांगितले. फिर्यादीचे आईचे व पत्नीचे २० तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry)
घेऊन फिर्यादीस पिंपरी येथे मुथुट फायनान्स (Muthoot Finance) येथे गोल्ड लोन (Gold Loan)
करण्यास लावले. या कर्जाचे आलेले ६ लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच फिर्यादीचे ड्रायव्हींग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड धमकावून काढून घेतले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव (Sub-Inspector of Police Jadhav) तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Lawyer blackmails young man by threatening to make photos of unnatural relationship go viral; Embezzled money by forcing them to take loans

हे देखील वाचा :

Pune Crime | उत्तमनगर परिसरात नवविवाहितेची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी मुंबई कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 78 जणांवर कारवाई

Pune Chandni Chowk | 1 व 2 ऑक्टोबरला चांदणी चौकातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी रस्ते

Related Posts