IMPIMP

Pune Crime | पुण्यातील हडपसर परिसरात विवाहितेची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या; पतीसह निवृत्त प्राध्यापक सासर्‍यांना अटक

by nagesh
Builder Paras Porwal Suicide | mumbai famous builder paras porwal ended his life by jumping from the building

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | सासरी होणार्‍या छळाला (Dowry Case) कंटाळून विवाहितेने बिल्डिंगच्या टेरेसवरुन उडी मारुन
आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) पतीसह निवृत्त प्राध्यापक
असलेल्या सासर्‍यांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तरुण कानडे Tarun Kanade (वय ३०), मदन कानडे (Madan Kanade) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सासू सपना कानडे, अरुण कानडे (सर्व रा. नवरत्न एक्झोटिका सोसायटी, हांडेवाडी रोड – Handewadi Road, हडपसर – Hadapsar) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत (Pune Crime) . दिव्या कानडे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी शामराव आनंदा बनसोडे (वय ५०, रा. धानेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. १४५/२२) फिर्याद दिली आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी घडली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या हिचा विवाह २१ जानेवारी २०२१ रोजी तरुण कानडे याच्याशी झाला होता. तरुण कानडे हा एमबीए (MBA) झाला असून पुण्यातील एका नामवंत शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करीत आहे. त्याचे वडिल मदन कानडे औरंगाबादमधील महाविद्यालयात प्राध्यापक होते. विवाहानंतर गेल्या दिवाळीपासून दिव्याचा छळ सुरु झाला. लग्नात मानपान केला नाही, म्हणून तिच्याकडे पैशांची व सोन्यांच्या दागिन्यांची मागणी केली जाऊ लागली. तिच्या वडिलांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी येऊन विचारणा केल्यावर त्यांना मात्र आमची कोणतीही मागणी नसल्याचे सांगितले. त्यानंतर दिव्याचा छळ कमी झाला नाही. या छळाला कंटाळून तिने राहत्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील टेरेसवरुन सोमवारी सकाळी साडेसात वाजता उडी मारुन आत्महत्या केली.
वानवडी पोलिसांनी पती व सासरे यांना अटक केली आहे.

 

 

Web Title : Pune Crime | Married woman commits suicide by jumping from terrace in Hadapsar area of Pune; Retired professor in-laws arrested along with her husband

 

हे देखील वाचा :

Mumbai High Court On Pune Water Supply | पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांत टँकरने पाणी पुरवठा करा – मुंबई हाय कोर्ट

Road Safety Rules | देश अपघातमुक्त होण्यासाठी शासनाबरोबरच मोटार ड्रायव्हिंग स्कूल संस्थांची भूमिका महत्वाची – जितेंद्र पाटील

MNS Chief Raj Thackeray | ‘औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश काढले नाहीत’ ! पण, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह?

 

Related Posts