IMPIMP

Pune Crime | ‘माझ्यासोबत लग्न कर नाहीतर…’, धमकी देऊन तरुणीचा विनयभंग

by nagesh
Pune Crime | Shocking! Rape of a young woman studying law by luring her into marriage; Kasba Pethe incident in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | माझ्यासोबत लग्न (Marriage) कर नाहीतर मी तुला सोडणार नाही, असे म्हणून फोटो व्हायरल
(Photo Viral) करण्याची धमकी (Threat) देऊन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad)
भोसरी (Bhosari) येथे घडली आहे. तसेच आरोपीने पीडित तरुणीच्या होणाऱ्या पतीला बदनामीकारक माहिती देऊन तिच्यासोबत लग्न न करण्याची धमकी दिली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) वैभव रामचंद्र सोमवंशी Vaibhav Ramchandra Somvanshi (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्यावर आयपीसी IPC 354, 354 (ड), 500, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हा प्रकार भोसरी येथील धावडे वस्ती (Dhavade Vasti) येथे 22 एप्रिल रोजी घडला आहे. याबाबत पीडित तरुणीने बुधवारी (दि.27) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी तरुणीला फोन करुन तुझे लग्न ठरल्याचे मला माहित झाले आहे. तुझे लग्न कसे होते तेच मी पाहतो. तुझ्या होणाऱ्या पतीला (Husband) आपल्याबाबत सांगून तुझे लग्न मोडतो. तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर आपल्या दोघांचे फोटो तुझ्या होणाऱ्या पतीला पाठवून तुझी लाईफ बरबाद करतो, अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली. (Pune Crime)

 

आरोपीने वारंवार तरुणीला फोन करुन त्याच्यासोबत लग्न करण्याची मागणी घातली. तरुणीच्या वडिलांना फोन करुन फिर्यादी तरुणीचे लग्न न करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी तरुणीच्या होणाऱ्या पतीचा फोन नंबर मिळवून त्यांना फोन केला. आरोपीने फिर्यादीच्या पतीला चुकीची माहिती दिली. फिर्यादीचे फोटो पाठवून तिची बदनामी करुन फिर्यादी तरुणीसोबत लग्न न करण्याबाबत धमकी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, फिर्यादी तरुणी 26 एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास तिच्या घराजवळ उभी होती.
त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन त्या ठिकाणी आला. त्याने माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपीने तरुणीचा विनयभंग केला, असे तक्ररीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे (PSI Kendre) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Marry me or else threatening and molesting the girl

 

हे देखील वाचा :

MNS on CM Uddhav Thackeray | मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘कौतुक कार्यसम्राटांचं होतं, Facebook वरील टोमणेसम्राटांचं नाही’

Diabetes | तुम्हाला मधुमेह आहे की नाही कसे ओळखाल?, जाणून घ्या याची लक्षणे

Sharad Pawar on Chandrakant Patil | ‘हिमालयात जाईन असं शरद पवार देखील म्हणाले होते’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts