IMPIMP

Pune Crime | विनयभंग करुन अल्पवयीन मुलीला ढकलून देऊन केले बेशुद्ध; जनता वसाहतीतील घटना

by nagesh
Pune Crime | Shocking ! Young boy stabbed 10th std young girl in school Farewell Ceremony vadgaon sheri of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | तू मला खूप आवडते, असे म्हणून घरात शिरुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला मारहाण करुन भिंतीवर ढकलून देऊन बेशुद्ध करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) जनता वसाहतीत (Janta Vasahat) राहणार्‍या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत जनता वसाहतीत राहणार्‍या एका १६ वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही मुलगी जनता वसाहतीत राहते. त्यांच्याच वसाहतीत राहणारा मुलगा तिला वारंवार वाटेत अडवतो. तिचा पाठलाग करतो. गुरुवारी दुपारी ही मुलगी निलायम पुलाजवळून जात होती. तेव्हा या तरुणाने तिला अडविले. तो फिर्यादीला तू मला खूप आवडते, माझ्याशी नीट का बोलत नाही, असे म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादीला हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर ही मुलगी आपल्या आजीच्या राहते घरात गेली. तिच्या मागोमाग हा तरुण आला. त्याने आजीला ढकलून देऊन घरात शिरला. फिर्यादीशी चाळे करुन तिला जबरदस्तीने जवळ ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन (Molestation Case) केले. तिला पुन्हा हाताने व लाथाबुक्यांने मारहाण करुन भिंतीवर ढकलून दिले़ त्यामुळे ही मुलगी बेशुद्ध पडली. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर तिने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | minor girl Molestation Case Incidents in the Janata vasahat

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | एका वर्षात 13,500% चा जबरदस्त रिटर्न ! ‘या’ शेयरने 1 लाखाचे केले 1 कोटी रुपये, तुम्ही खरेदी केले का ?

Sanjay Raut | गोव्यातील रश्मी शुक्ला कोण ? खा. संजय राऊत यांचे भाजपवर जोरदार शिरसंधान

Pune Cyber Crime | धक्कादायक ! फेसबुकवर 56 वर्षाच्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकून बदनाम; तिच्या दुसर्‍या पतीनं पाठविले जावयाला अश्लिल फोटो

 

Related Posts