IMPIMP

Pune Crime | लोनॲप” फसवणूक टोळीला ‘मोक्का’, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे ‘मोक्का’ कारवाईचे ‘शतक’

by nagesh
Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | “लोन ॲपच्या (Loan App) माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कर्ज घेण्यास भाग पाडून
लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई (MCOCA Action) करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांवर (Cyber Criminal) “मोक्का”नुसार
झालेली ही पहिली कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी (Pune Police) केला आहे. दरम्यान, या टोळीतील मुख्य आरोपीचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध
असल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्का कारवाईचे (Pune Crime) शतक पूर्ण
केले असून चालु वर्षात 37 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टोळी प्रमुख धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. सोलापुर (टोळी प्रमुख), स्वप्नील हनुमत नागटिळक ( वय २९, रा. विजापुर रोड, सोलापुर) , श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (वय २६, रा त्रिवेणीनगर भेकराईनगर फुरसुंगी हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (वय ४३, रा. मुमताजनगर कुमठेनाका, सोलापुर, सॅम्युअल संपत कुमार (वय ४० , डिकोजा रोड बेलातुर बंगलोर, कर्नाटक ), सय्यद अकिब पाशा ( वय २३, वर्षे रा. बेंगलोर, कर्नाटक ), मुबारक अफरोज बेग
( वय २२, रा.बेंगलोर, कर्नाटक), मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम ( वय ४२, रा. कोझीकोड अरुर केरळ ), मोहम्मद मनियत पिता मोहिदु (वय ३२, रा. पडघरा, केरळ) अशी “मोक्का” नुसार कारवाई झालेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

टोळी प्रमुख धीरज पुणेकर याच्यासह आरोपींनी संघटित गुन्हेगारी करून आर्थिक फायदा देण्याचे आमिष दाखवित हजारो नागरिकांची फवणुक केली. टोळीतील इतर आठ साथीदार यांचे आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले, लोन ॲप द्वारे लोकांना त्रास देण्याचे प्रकार काही वर्षांपासून सुरू होते.
त्यामुळे दोन जणांनी आत्महत्या केल्या, तर एक खुनाची घटना देखील घडली.
या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांना कारवाई करून हे सर्व प्रकरण उघडकीस आणले.
त्याच बरोबर हे प्रकरण महाराष्ट्रासह देशभरातील लोकांना फसवित असल्याचे उघड झाले,
त्यांचे धागेदोरे अन्य देशांतही आहेत, अशी माहिती पुढे आली आहे.
त्यादृष्टीने संबंधित टोळी विरुद्ध कडक कारवाई केली आहे.
तसेच सायबर गुन्ह्यात पहिल्यांदाच “मोका” नुसार कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | “Mokka” to “LoanApp” fraud gang, “Century” of Police Commissioner Amitabh Gupta’s “Mokka” operation

 

हे देखील वाचा :

Shivsena On Eknath Shinde | सेनेची एकनाथ शिंदेवर जोरदार टीका, डुप्लिकेट शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचे भाषण म्हणजे फक्त ’मोदी-शहा चालिसा’चे वाचन

Madhuri Misal | माधुरी मिसाळ यांनी सत्य मांडताच कार्यकर्ते खुश, म्हणाल्या – ‘चंद्रकांतदादा, पुण्यातील नेते मंडळी तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना…’

Shimron Hetmyer | ‘प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,’ शिमरॉननं रिपोस्ट केली स्टोरी

 

Related Posts