IMPIMP

Madhuri Misal | माधुरी मिसाळ यांनी सत्य मांडताच कार्यकर्ते खुश, म्हणाल्या – ‘चंद्रकांतदादा, पुण्यातील नेते मंडळी तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना…’

by nagesh
Madhuri Misal | dada the leaders of the city do not allow the activists to reach you madhuri misal said chandrakant patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – शहरात झालेल्या भाजपाच्या (BJP) कार्यक्रमात पर्वती मतदार संघाच्या (Parbati Constituency) आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी शहरातील नेते मंडळी करत असलेल्या कुरघोड्या आपल्या भाषणात उघड केल्या. माधुरी मिसाळ (Madhuri Misal) म्हणाल्या, भाजपचे सरकार (BJP Government) आले आहे. आता विविध महामंडळांवर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्या. तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना शहरातील नेते मंडळी पोहोचूच देत नाहीत. आ. मिसाळ यांनी हे सत्य मांडताच उपस्थित कार्यकर्त्यांनी सुद्धा टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना समर्थन दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा सत्कार सोहळा टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. माधुरी मिसाळ बोलत होत्या. कार्यकर्त्यांच्या मनातील खंत मिसाळ यांनी मांडल्याने त्यांचे भाषण कार्यकर्त्यांना अधिक भावले.

 

आ. मिसाळ (Madhuri Misal) यांनी नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली की, कार्यकर्ता मोठा झाला तर आपल्याला नुकसान होईल म्हणून नेते मंडळी, त्याला तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. त्यामुळे सच्चा कार्यकर्ता मागे राहत आहे, त्याला न्याय द्या.

 

छोटे मन से कोई बडा नही होता
तुटे मन से कोई खडा नही होता

 

हा शेर म्हणत आ. मिसाळ यांनी शहरातील पदाधिकार्‍यांना सुनावले.
त्या म्हणाल्या, भाजप सरकार नसताना आपले सरकार येईल की नाही या भीतीने जे कुंपणावर होते
केवळ मलिदा पाहत होते, त्यांनाही यापुढे लक्षात ठेवा व आगामी निवडणुकीत निष्ठावंतांना न्याय द्या.
त्यांच्या या मागणीचे उपस्थितांनी घोषणा देत स्वागत केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे शहर – स्वच्छ शहर सुरक्षित शहर हा माझा संकल्प आहे.
तरीही माझ्या निवडीच्या अभिनंदनाचे फ्लेक्स शहरभर लावले गेले.
शहर विद्रूपीकरणात अशाच अनधिकृत फ्लेक्सचा मोठा हातभार असतो.
तुम्हाला एवढीच हौस असेल तर अधिकृत बोर्ड भाड्याने घेऊन तेथे दहाऐवजी दोनच फ्लेक्स लावा.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी शहरातील पदाधिकार्‍यांना इशारा दिला की,
माझ्या कार्यक्रमात यापुढे फटाके वाजविले तर मी गाडीतून न उतरताच परत जाईन.

 

 

Web Title :- Madhuri Misal | dada the leaders of the city do not allow the activists to reach you madhuri misal said chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Shimron Hetmyer | ‘प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,’ शिमरॉननं रिपोस्ट केली स्टोरी

Amravati ACB Trap | 30 हजाराची लाच घेताना उपविभागीय अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

IND vs PAK आज होणार सामना, कधी आणि कुठे होणार मॅच, जाणून घ्या

 

Related Posts