IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात तरुणाचा खून; मृतदेह दरीत फेकल्यानं प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | तरुणाचा खून (Murder In Pune) करुन मृतदेह दरीत फेकून दिल्याची (Dead Body Thrown
into Valley) खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) खेड तालुक्यात (Khed Taluka) उघडकीस आली आहे. पुणे – नाशिक
महामार्गावर (Pune-Nashik Highway) खेड घाटात तरुणाचा खून करुन मृतदेह दरीत फेकून दिला. हा खून कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप
समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

स्वप्नील सखाराम चौधरी Swapnil Sakharam Chaudhary (वय – 25 आंबेओहळ, खरपुडी बुद्रुक, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पुणे – नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात (Khed Ghat) चौधरी याचा सोमवारी (दि.21) रात्रीच्या सुमारास खून झाला. चौधरी याला दारु
पाजून खून करुन मृतदेह महामार्गालगत असणाऱ्या खोल दरीत टाकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Pune Crime)

 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील (Sub – Divisional Police Officer Sudarshan Patil),
खेड पोलीस ठाण्याचे (Khed Police Station) पोलीस निरीक्षक सतीश गुरव (Police Inspector Satish Gurav),
महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे (PSI Varsharani Ghate), सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड (API Rahul Lad)
यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. तरुणाच्या डोक्यात मानेवर धारदार हत्याराने वार करुन खून करण्यात आला आहे.

 

खेड उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले की, खून झालेला तरुण खेड तालुक्यातील खरपुडी (Kharpudi) येथील असून त्याला खेड घाटात कोणी आणले येथे का आले होते. कशासाठी आले होते आणि त्याचा खून कोणी केला. याबाबतचा तपास सुरु आहे.
तसेच लवकरच आरोपींना अटक केली जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | murder of a Swapnil Sakharam Chaudhary in khed ghat on pune nashik highway the bodies were thrown into the valley

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police | नवापुर पोलीस ठाण्यातील व्यायाम शाळेचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Nandurbar Police | नंदुरबार पोलीस दलातील नवापुर पोलीस ठाण्यातील महिला विश्राम गृहाचे उद्घाटन

Nandurbar Police | ‘नियमित वाचन केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर व व्यक्तीमत्वावर होतो’- IG बी.जी. शेखर पाटील

Chandrakant Patil | ‘शरद पवारांनी नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला’, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

 

Related Posts