IMPIMP

Nandurbar Police | नवापुर पोलीस ठाण्यातील व्यायाम शाळेचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

by nagesh
Nandurbar Police | Special Inspector General of Police B.G. Sheekhar Patil Superintendent of Police PR Patil Nandurbar Police Gym Inauguration

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाइन–  Nandurbar Police | पोलिसांना कर्तव्य पार पाडत असताना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊन व्यायाम करुन
आपले आरोग्य (Health) उत्तम ठेवणे आवश्यक असते. यासाठी नंदुरबार पोलीस दलातील (Nandurbar Police) नवापुर पोलीस ठाण्यातील
(Navapur Police Station) पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी व्यायाम शाळा (Gym) सुरु करण्यात आली आहे. या व्यायाम
शाळेचे उद्घाटन (Inauguration) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील (Special Inspector General of Police of
Nashik Range B.G. Shekhar Patil) यांच्या हस्ते मंगळवारी (दि.22) करण्यात आले. यावेळी नवापुरच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील (Navapur
Municipality Mayor Hemalatha Patil), पोलीस अधीक्षक पी.आर पाटील (Superintendent of Police PR Patil) यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

जनतेची सुरक्षा हे पोलिसांचे कर्तव्य असून त्यासाठी पोलीस दिवसरात्र मेहनत करुन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेसोबतच स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देवून व्यायाम करुन आपली शरीरयष्टी उत्तम ठेवणे गरजेचे आहे. मात्र, रात्रगस्त (Night Patrolling), गुन्हयाचे तपासासाठी (Crime Investigation) बाहेर गावी जाणे, बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था (Law and Order) बंदोबस्त अशा अनेक काणांमुळे पोलिसांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे पोलिसांना वेगवेगळ्या प्रकरच्या व्याधी होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर पाटील (SP PR Patil) यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीय यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात लोक सहभागातून व्यायाम शाळा उभारण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार नंदुरबार पोलीस दलातील (Nandurbar Police) नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील उपयोगात नसलेल्या खोलीची दुरुस्ती करुन त्याठिकाणी व्यायाम शाळा उभारली.

 

 

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी नंदुराबर जिल्हा वार्षिक तपासणीसाठी (Annual Inspection) भेट दिली. यावेळी त्यांच्याहस्ते नवापुर पोलीस ठाण्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना बी.जी शेखर पाटील म्हणाले, पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेसोबत स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे त्यासाठी व्यायाम करुन शरीरयष्टी चांगली ठेवणे गरजेचे आहे. तसेच दररोज व्यायाम केल्याने होणारा मानसिक ताण तणाव देखील दुर होतो. नियमित व्यायामाने स्वास्थ्यावर चांगला परिणाम होतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

यावेळी पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक बी.जी. शेखर पाटील, नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar), उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hiray), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Local Crime Branch Police Inspector Ravindra Kalamkar), नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर (Police Inspector Balasaheb Bhapkar) यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title :- Nandurbar Police | Special Inspector General of Police B.G. Sheekhar Patil Superintendent of Police PR Patil Nandurbar Police Gym Inauguration

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police | नंदुरबार पोलीस दलातील नवापुर पोलीस ठाण्यातील महिला विश्राम गृहाचे उद्घाटन

Nandurbar Police | ‘नियमित वाचन केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर व व्यक्तीमत्वावर होतो’- IG बी.जी. शेखर पाटील

Chandrakant Patil | ‘शरद पवारांनी नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला’, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

Sara Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरच्या मुलीकडून ‘या’ क्रिकेटरचं कौतुक, सोशल मीडियावर पोस्ट केलं त्याचं पोस्टर

 

Related Posts