IMPIMP

Nandurbar Police | ‘नियमित वाचन केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर व व्यक्तीमत्वावर होतो’- IG बी.जी. शेखर पाटील

by nagesh
Nandurbar Police | Regular reading of books has an effect on our daily life and personality IG B.G. Shekhar Patil

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाइन– Nandurbar Police | नियमित वाचन (Regular Reading) केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर व व्यक्तीमत्वावर होत असतो. तसेच माणसाला ज्याप्रमाणे जीवन जगत असताना अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे मेंदूला (Brain) खायची गरज असते आणि मेंदूचे खाद्य म्हणजे वाचन, असे प्रतिपादन नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील (Special Inspector General of Police of Nashik Range B.G. Shekhar Patil) यांनी केले. नंदुरबार पोलीस (Nandurbar Police) दलातील नवापुर पोलीस ठाण्यात
(Navapur Police Station) सुरु करण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन (Library Inauguration) त्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलीस उप महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र बी.जी. शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्राचा कार्यभार स्विकारल्यानंतर परिक्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात
व्यायाम शाळा, वाचनालय, पोलीस क्लब, पोलिसांचे ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी व विरंगुळा करण्यासाठी वाचनालय उपलब्ध असले पाहिजे. जेणेकरुन
पोलीस अधिकारी, अंमलदार फावल्या वेळेचा चांगला उपयोग करु शकती. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (Superintendent of Police
PR Patil) यांनी नंदुरबार पोलीस (Nandurbar Police) दलातील सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या पाल्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात
वाचनालय सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याला कारणही तसेच होते, बी.जी शेखर पाटील यांनी वाचनाची आणि लिखाणाची आवड आहे. त्यांचे
‘रानजुई’ हे आठवे पुस्तक नुकतेच प्रकाशीत झाले आहे.

 

 

पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या सूचनेनंतर नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील उपयोगात नसलेल्या खोलीची दुरुस्ती करुन त्याठिकाणी वाचनालय उभारले. तसेच पुस्तकांची यादी पोलीस अधीक्षकांकडे पाठवली. याला पोलीस अधीक्षकांनी तात्काळ मंजुरी देली. पोलीस ठाण्याच्या आवारतच आधुनिक वाचनालय सुरु केल्याने नवापुर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह त्यांचे कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

 

यावेळी पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक बी.जी. शेखर पाटील, डॉ. विद्युलता शेखर पाटील, नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil), अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar), उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hiray), नगराध्यक्ष हेमलता पाटील (Navapur Municipality Mayor Hemalatha Patil) , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Local Crime Branch Police Inspector Ravindra Kalamkar), नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर (Police Inspector Balasaheb Bhapkar) यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title:  Nandurbar Police | Regular reading of books has an effect on our daily life and personality IG B.G. Shekhar Patil

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘शरद पवारांनी नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला’, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

Sara Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरच्या मुलीकडून ‘या’ क्रिकेटरचं कौतुक, सोशल मीडियावर पोस्ट केलं त्याचं पोस्टर

Multibagger Penny Stock | 1 रुपयापेक्षा सुद्धा कमी होता भाव, वर्षभरात ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; जाणून घ्या

Mumbai High Court On Sameer Wankhede | वानखेडेंची याचिका तात्काळ सुनावणीस आल्याने हायकोर्ट संतप्त

 

Related Posts