IMPIMP

Pune Crime | NDPS गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

by nagesh
HC On Minor Girl Rape Case | 'Intercourse with the consent of a minor girl is rape' - Delhi High Court

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी पुण्यातील (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti
Vidyapeeth Police Station) अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. अनुराग अरुण पाटील Anurag
Arun Patil (वय-19 रा. फ्लॅट नं. 101 भैरवनाथ अपार्टमेंट शेजारी, आंबेगाव बुद्रुक) असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या जामिनाचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे (Additional Sessions Judge A.N. Murray) यांनी जारी केल्याची माहिती ॲड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) यांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारती विद्यापीठ पोलिसांनी कोकेन (Cocaine) बाळगल्याप्रकरणी आर्यन उर्फ लावण्य राजेंद्र पाटील (वय-20) आणि अनुराग अरुण पाटील (वय-19) यांच्याविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली होती. आरोपी अनुराग पाटील हा सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहे. त्याने ॲड. प्रसाद निकम यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने अनुराग पाटील याचा जामिन मंजूर केला. (Pune Crime)

 

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी आर्यन उर्फ लावण्य पाटील हा अनुराग पाटील याच्या घरी दोन दिवसांसाठी राहण्यासाठी आला होता. तो पुण्यात शिक्षणासंबंधी माहिती घेण्यासाठी आला होता. पोलिसांना सापडलेला अंमली पदार्थ अनुरागच्या बॅगेत सापडला नसून लावण्य पाटील याच्या बॅगेत सापडला आहे. त्यामुळे याचा अनुराग पाटील याच्याशी काहीही संबंध नाही. तसेच आरोपीचे वय लहान असुन तो सध्या शिक्षण घेत आहे. त्यामुळे अनुराग पाटील याचा जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद वकिलांनी केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. आरोपीला प्रत्येक रविवारी सकाळी 10 ते 1 या वेळेत पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. ॲड. प्रसाद निकम यांना कामकाजामध्ये ॲड. तन्मय देव (Adv. Tanmay Dev), ॲड. अरुणा अंगरखे (Adv. Aruna Angarkhe) आणि ॲड. मन्सूर तांबोळी (Adv. Mansoor Tamboli) यांनी मदत केली.

 

Web Title :- Pune Crime | NDPS grants bail to accused

 

हे देखील वाचा :

PMSYM | सरकारकडून दरमहिना रू. 3000 मिळवण्यासाठी इथं 46 लाखापेक्षा जास्त लोकांनी केले रजिस्ट्रेशन, जाणून घ्या काय आहे योजना आणि कसा करावा अर्ज?

Pune Crime | हरियाणा आणि दिल्लीतील तब्बल 22 गुन्ह्यात वाँटेड असणाऱ्या तोतया कस्टम अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक, पोलिसांना ‘संमोहित’ करुन झाला होता फरार

Disha Patani | दिशा पटनीने समुद्रकिनाऱ्यावरील सुर्यप्रकाशातील फोटो केले शेअर

 

Related Posts