IMPIMP

Pune Crime News | हौसेकरिता अग्नीशस्त्रे बाळगणार्‍यास कोंढवा पोलिसांकडून अटक; 2 पिस्तुलांसह 4 जिवंत काडतुसे जप्त

by nagesh
Pune Crime News | Arrested by Kondhwa Police for carrying firearms for Hause; 4 live cartridges recovered from 2 pistols

पुणे :  (बासित शेख) : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | हौसेकरिता गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे बाळगणार्‍यास कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 2 गावठी पिस्तुल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोंढवा पोलिस ठाण्याचे (Kondhwa Police Station) तपास पथक हे कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. उंड्री पोलिस चौकीच्या जवळील नाल्यामध्ये ओमकार घुले हा थांबलेला असून त्याच्या कमरेला पिस्तुलासारखे हत्यार असल्याची माहिती पोलिस अंमलदार लक्ष्मण होळकर यांना खबर्‍याकडून मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील हे पंचासोबत घटनास्थळावर गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी ओमकार बाळासाहेब घुले (24, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, उंड्री) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून पिस्तुल आणि जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. त्याच्याविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. पोलिसांनी सखोल तपास केला असता त्यांनी आरोपीकडून आणखी एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी आरोपीकडून एकुण 2 गावठी पिस्तुल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. (Pune Crime News)

 

सहाय्यक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pornima Taware), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले
(PI Sanjay Mogle) यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे
उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil) , पोलिस हवालदार सतिश चव्हाण,
पोलिस नाईक जोतिबा पवार, पोलिस अंमलदार लक्ष्मण होळकर, ज्ञानेश्वर भोसले आणि संतोष बनसुडे
यांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून अग्नीशस्त्रे जप्त केली आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Arrested by Kondhwa Police for carrying firearms for Hause; 4 live cartridges recovered from 2 pistols

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बॅनरबाजी…

MP Sanjay Raut | ‘धर्मवीर’ चित्रपटावरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले – ‘हा चित्रपट…’

 

Related Posts