IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रसिद्ध सोन्या-चांदीच्या व्यावसायिकाची फसवणूक, छायाचित्र व नावाचा गैरवापर करुन मित्रांना ठगवण्याचा प्रयत्न

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime News | नाव आणि छायाचित्राचा वापर करुन सोशल मीडियवार बनावट अकाउंट (Fake Account On Social Media) उघडून पैशांची मागणी करण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाचे छायाचित्र व ट्रू कॉलवर त्यांच्या नावाचा वापर करुन त्यांच्या व्यावसायिक व मित्रांकडे पैशांची मागणी करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत लक्ष्मी रोडवरील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक यांनी मंगळवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन 99742XXXX या मोबाईल धारकावर आयपीसी 419, सह आयटी अॅक्ट कलम 66(सी) व 66(डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 14 मार्च ते 26 मार्च या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाईल धारकाने ट्रू कॉलरवर लक्ष्मी रोडवरील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाचे नाव व फोटो वापरून त्यांच्या अनेक व्यावसायिक व मित्रांना फोन केला. फोन वरुन आपण लक्ष्मी रोडवरील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाचा मुलगा बोलत असल्याचे खोटे सांगितले. आरोपीने तोतयेगिरी करुन विश्वास संपादन करुन अनेकांकडे पैशांची मागणी करुन ठकवणूक करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, याबाबत लक्ष्मी रोडवरील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाच्या मित्राने त्यांना फोन करुन याबाबत सांगितले. प्रसिद्ध सराफा व्यावसायिक हे लक्ष्मी रोडवरील कार्य़ालयात बसलेले असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण घोडके (PI Arun Ghodke) करीत आहेत.

Supriya Sule To Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी जावे; सुप्रिया सुळे यांचा टोमणा

Related Posts