IMPIMP

Pune Crime News | पुण्यात घरफोडीचे सत्र सुरुच, वानवडी परिसरात 29 लाखांचा ऐवज लंपास

by sachinsitapure
House Burglary

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर व परिसरात घरफोडीच्या (House Burglary) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वानवडी परिसरात भरदिवसा बंद घराचे कुलुप तोडून घरातील 28 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार रविवारी (दि.10) दुपारी साडेतीन ते सव्वा सहाच्या दरम्यान वानवडी भागातील आझादनगर येथे घडला आहे.

याबाबत तारा दीपक राय (वय-64 रा. आझादनगर, वानवडी) यांनी सोमवारी (दि.11) वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात आयपीसी 380, 454 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती घराला कुलूप लावून दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रार्थना करण्यासाठी बीटी कवडे रोडवरील नेपाली चर्च येथे गेले होते. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातील बेडरुमध्ये असलेल्या लोखंडी कपाट व तिजोरी तोडून त्यामधील 28 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी तिजोरीमधून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेले. सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास फिर्य़ादी घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन तपास सुरु केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दुकानातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी

वानवडी : बंद दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील 46 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दोन कानातले जोड व रिपेअरींगला आलेले 4 मोबाईल चोरुन नेले. हा प्रकार शनिवारी (दि.9) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत अलिम अब्दुल करीम शेख (वय-37 रा. येरवडा जेल जवळ, नागपुर चाळ, येरवडा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. फिर्य़ादी यांचे हांडेवाडी रोडवर दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोल्डड्रिंक मध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून तरुणीवर बलात्कार, हडपसर परिसरातील प्रकार

Related Posts