IMPIMP

Pune Crime News | मार्केटयार्डात कोयता गँगचा धुडगुस; मोटारसायकली, हातगाड्याचे नुकसान करुन पसरविली दहशत

by nagesh
Pune Crime News | Koyta gang's rumble in the marketyard; Panic spread by damaging motorcycles, handcarts

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | कोयते, तलवारी घेऊन लोकांना धाक दाखवत पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करत दहशत
पसरविणार्‍या टोळक्यांचे प्रकार वाढले आहे. मार्केटयार्डामधील आंबेडकरनगर (Ambedkarnagar, Market Yard) येथे अल्पवयीन मुलांनी कोयते व
तलवारी नाचवत मोटारसायकली व हातगाडीची तोडफोड केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी इस्माईल अयाज शेख (वय ३२, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२/२३) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकरनगरमधील सहा ते सात अल्पवयीन मुले गुरुवारी रात्री
दहा वाजता गल्ली नंबर १६ मध्ये कोयते व तलवारी नाचवत लोकांना दुकाने बंद करायला लावण्याची धमकी देत फिरत होते. त्यांनी लोकांच्या ७ मोटारसायकली व एका हातगाडीवर कोयत्याने व तलवारीने वार करुन त्यांचे नुकसान केले. लोकांमध्ये दहशत पसरवून ते निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Koyta gang’s rumble in the marketyard; Panic spread by damaging motorcycles, handcarts

 

हे देखील वाचा :

Nagpur Crime | नागपूर हादरलं! नराधमांनी महिलेच्या मृतदेहावर केले सामूहिक अत्याचार

Nagpur Crime | खासदार क्रीडा महोत्सवात भाजप नेत्याच्या मुलाने घातला राडा; पंच, आयोजकांना केली मारहाण (व्हिडिओ)

Sandeep Deshpande | मुंबईत कोरोनाकाळात मोठा घोटाळा; मनसे नेते संदिप देशपांडे यांचा खळबळजनक दावा, २३ जानेवारीला सादर करणार पुरावे

 

Related Posts