IMPIMP

Pune Crime | ‘हप्ता दिला नाही तर जीवंत सोडणार नाही, गोडाऊन जाळून टाकू’ ! धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक

by nagesh
Pune Crime | The sister's son tried to rape the woman and the girl by abducting her in anger

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मी तुला व तुझ्या शेठला जिवंत सोडणार नाही. माझी या भागात मोठी टोळी आहे. माझी या भागात मोठी दहशत आहे. तू आणि शेठने दरमहा दोन हजार रुपये हप्ता (Hafta Wasuli) दिला नाही तर गोडाऊन (Godown) जाळून टाकीन, अशी धमकी (Threat) देऊन खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला आहे. पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) कुणाल पप्पु इजगत (Kunal Pappu Ijagat) याच्यावर IPC 386 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत रामदास ज्ञानोबा पवार Ramdas Gyanoba Pawar (वय – 54 रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुणाल पप्पु इजगत (वय – 23 रा. निराधारनगर, रेल्वे लाईन समोर, पिंपरी) याला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.17) दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास लिंक रोडवरील भारत सेल्स कॉर्पोरेशन (Bharat Sales Corporation) च्या गोडाऊनमध्ये घडला. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरीतील लिंक रोड (Link Road) येथील गोडाऊनमध्ये असताना आरोपी त्याठिकाणी आला. दरमहा मला दोन हजार रुपये हप्ता न दिल्यास तुला व तुझ्या शेठला जिवंत सोडणार नाही. माझी या भागात दहशत असून माझी टोळी आहे, असे म्हणत गेटवर जोरात लाथा मारल्या. हप्ता न दिल्यास एकही गाडी गोडाऊनमधून बाहेर जाऊ देणार नाही. रात्रीचे गोडाऊन जाळून टाकू अशी धमकी देत खंडणी मागितली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Pimpri Police Arrest One In Ransom Case

हे देखील वाचा :

Supriya Sule On Raj Thackeray | सुप्रिया सुळेंनी उडवली राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली, म्हणाल्या…

SBI MCLR Rate | एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! महाग होणार तुमचे लोन, SBI बँकेने MCLR मध्ये केली 0.10% वाढ

Bank Timing Change | RBI चा मोठा निर्णय ! आजपासून बँक उघडण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या

Related Posts