IMPIMP

Pune Crime | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून वारजे माळवाडी परिसरात संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळीवर मोक्का

by nagesh
Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune Crime | वारजे परिसरात (Warje Malwadi) संघटित गुन्हेगारी (Organized Crime) करणार्‍या सराईत अविनाश गुप्ता (Avinash Gupta) याच्यासह टोळीतील १३ जणांविरूद्ध मोक्कानुसार (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्कानुसार केलेली ही १०३ वी कारवाई आहे. मागील दहा महिन्यातील ही ४० वी कारवाई आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अविनाश रामप्रसाद गुप्ता (वय-२०, टोळीप्रमुख रा. शिंदे पुल, शिवणे), सागर भागवत वारकरी ( वय २२,रा. राहुलनगर,शिवणे) अविनाश सुरेश शर्मा (वय १९, रा. रामनगर, वारजे) विकास सिब्बन गौड (वय १८, रा.राहुलनगर, शिवणे) आकाश सिब्बन गौड (वय १९) म्हम्या उर्फ संदिप नथुराम खैरे (वय ४१, रा. रामनगर) , मेहबुब बाबु दफेदार (वय-१९, रा. शिवणे ) याच्यासह इतर अल्पवयीन साथीदारांविरूद्ध कारवाई केली आहे. (Pune Crime)

 

वारजे परिसरात गुप्ता टोळीने खुनाचा प्रयत्न , खंडणी, शस्त्र बाळगणे, दंगा करणे दहशत निर्माण करणे, मारीमारीचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्काचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना पाठविला. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे. सहायक पोलीस आयुक्त रूक्मिणी गलांडे तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अपर आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad), एसीपी रुक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande), वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके (Senior Police Inspector D.S. Hake), पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे (Police Inspector Dattaram Bagve), उपनिरीक्षक मनोज बागल (PSI Manoj Bagal), सचिन कुदळे, अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, प्रियांका कोल्हे यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

१०३ टोळ्याविरूद्ध मोक्का, ७१० सराईतांवर कारवाई


कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कास्त्र उगारले.
मागील दोन वर्षांत तब्बल १०३ टोळ्यातील ७१० सराईतांविरूद्ध कारवाई करण्यात आली.
त्याशिवाय मागील दहा महिन्यांत ४० टोळ्याविरूद्ध सराईत टोळ्यांचे वंâबरडे मोडले आहे.
तसेच एमपीडीएनुसार ८३ भार्इंना जेरबंद करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta MCOCA Action On The Organized Crime Gang In Warje Malwadi Area

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘आम्ही देखील तीन महिन्यांपूर्वी फटाके फोडले, आमचे हितचिंतक आजही…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Pune District Court | ‘महिला वकिलांनी कोर्टात केस नीट करू नयेत, लक्ष विचलित होते’ म्हणत पुणे जिल्हा कोर्टाने काढली नोटीस

MP Shrikant Shinde | मनसे- शिंदे गटाची युती? श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

 

Related Posts