IMPIMP

MP Shrikant Shinde | मनसे- शिंदे गटाची युती? श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

by nagesh
MP Shrikant Shinde | cm eknath shinde son mp shrikant shinde meet mns leader raj thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde ) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेतली आहे. यापूर्वी त्यांनी डोंबिवलीतील मनसेच्या दीपोत्सवाला (MNS Deepotsav) देखील भेट दिली होती. तसेच श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde ) यांनी डोंबिवलीतील मनसे कार्यालयाला देखील भेट दिली होती. त्यामुळे मनसे-शिंदे युतीच्या शक्यता वाढल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

श्रीकांत शिंदे हे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांचे विरोधक आहेत. त्यामुळे त्यांची ही भेट चर्चेचा विषय झाला आहे. मागील काही काळात अनेकवेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी (22 ऑक्टोबर) रोजी शिवाजी पार्कवर देखील मनसेच्या दीपोत्सावाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोडीने गेले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपोत्सावाचे उद्घाटन झाले. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे फडणवीस यांच्याच खूप जवळीक वाढली आहे.

 

डोंबिवलीतील मनसे कार्यालय भेटीच्या वेळी श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) म्हणाले, तुम्ही नवीन अर्थ काढू नका. मनसेच्या वतीने फडके मार्गावार दरवर्षी लायटिंग तसेच वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. यावेळी जनतेला चांगले चित्र पहायला मिळते. विरोधक एकत्र आल्याने नेहमीच चांगल्या गोष्टी होतात. दिवाळीनिमित्त सर्वजण एकत्र आहोत. कितीही विरोधक असलो, तरी एकमेकांच्या सूचना, आक्षेप घेऊन पुढे जायचे असते.

 

मनेसे आमदार राजू पाटील यांनी देखील त्यांच्या या आकस्मात भेटीवर प्रतिक्रिया दिली होती.
आम्ही जरी विरोधक असलो, तरी शत्रू नक्कीच नाही. आमचे राजकीय मतभेद आहेत.
त्यामुळे आमची मने जुळलेली आहेत. आता फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व साधून येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Shrikant Shinde | cm eknath shinde son mp shrikant shinde meet mns leader raj thackeray

 

हे देखील वाचा :

MNS | फटाक्यांवरुन पोलिसांत तक्रार करणाऱ्या मुस्लीम व्यक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक

Gopichand Padalkar | गोपिचंद पडळकरांचे जयंत पाटलांबद्दल भाकीत आणि राष्ट्रवादीत गोंधळ

Pune Crime | गुगल पे वर पैसे पेड केल्याचे भासवून लॅपटॉप नेला चोरुन

 

Related Posts