IMPIMP

Pune Crime | ऑमलेट नीट बनवता येत नाही म्हणून पुण्यातील पोलिस हवालदाराने दाबला गळा; खूनाचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | pune police crime instagram crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पत्नीला ऑमलेट निट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केल्याचा व मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबधीत पोलिस हवालदारालाच भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)

 

मनिष मदनसिंग गौड Manish Madansingh Gaud (50, दत्तविहार सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मनिष गौड पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. तर तो आंबेगाव बुद्रुक येथील दत्तविहार सोसायटीमध्ये राहण्यास आहे. बुधवारी (दि. 19) ऑक्टोबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास मनिष यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी ऑमलेट बनवले. बनविलेल्या ऑमलेटमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे मनिष हा पत्नीवर ओरडला त्यांना तुला ऑमलेट निट बनवून देता येत नाही का ? म्हणत शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धाऊन गेला. (Pune Crime) हाताने मारहाण करून फ्रिजवर ठेवलेली इलेक्ट्रॉनिक पक्कड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर दोन्ही हातने फिर्यादीचा गळा दाबून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला.

 

 

Web Title :-  Pune Crime | Police Havaldar Booked In Attempt To Murder Case

 

हे देखील वाचा :

TV Actress Vaishali Thakkar Suicide Case | वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणात राहुल नवलानीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

T20 World Cup 2022 | बीसीसीआयच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पदभार स्वीकारताच बुमराहबाबत केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकारांवरील उपचारासाठी 22 वर्ष कार्यरत असलेले एकमेव प्रिव्हेन्टीव्ह कार्डिओलॉजी सेंटर म्हणजे शनिकृपा हार्टकेअर सेंटर

 

Related Posts