IMPIMP

Pune Crime | बहिणीला दिली पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी ! तिने घेतले 1 कोटी 40 लाखांचे कर्ज; रेलिगेर फिनवेस्ट लि. विरूध्द गुन्हा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | तेलंगणातील (Telangana) महिलेने पुण्यात फ्लॅट घेतला़ त्या ठिकाणी भाडेकरु (Flat on Rent in Pune) ठेवण्यासाठी तिने पुण्यात राहणार्‍या आपल्या बहिणीला पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी (Power of Attorney) करुन करुन फ्लॅट भाड्याने देण्याचा अधिकार दिला. तिने त्याचा वापर करुन या फ्लॅटवर तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज घेऊन आपल्याच बहिणीची फसवणूक (Cheating Case) केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी जुली गिरीश अय्यर (वय ४४, रा. हैद्राबाद) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी ज्योती राजीव नायर (वय ४७) राजीव नायर (दोघे रा. पुष्पक पार्क, औंध – Aundh) आणि रेलिगेर फिनवेस्ट लि.(Religare Finvest Ltd) या अर्थपुरवठा करणार्‍या संस्थेवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अय्यर यांनी औंध (Aundh News) येथील वात्सल विहार अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट घेतला. तो भाड्याने देण्यासाठी त्यांनी त्यांची बहिण ज्योती नायर यांच्या नावे जनरल पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करुन दिले. त्या योगे त्यांना तो फ्लॅट भाड्याने देण्याचे अधिकार देण्यात आले होते. २०१३ मध्ये पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करण्यात आली होती (Pune Crime) . हा फ्लॅट विकण्याचा अथवा तारण ठेवण्याचा अधिकार दिला नसताना त्यांनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय फिर्यादी यांची बनावट सही करुन व कागदपत्रांचा वापर करुन रेलिगेर फिनवेस्ट या अर्थ पुरवठा करणार्‍या कंपनीकडून या फ्लॅटवर १ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज घेऊन फिर्यादी यांचे आर्थिक नुकसान केले आहे. पोलीस उपनिरीक्षक भालेराव (PSI Bhalerao) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | Power of attorney given to sister She took a loan of 1 crore 40 lakhs Religare Finvest Ltd Crime against shocking type in Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासूला अटक

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचा भाव

Grahak Peth Pune | ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवात बासमती, आंबेमोहोर, दुबराजपासून इंद्रायणी पर्यंत तब्बल 45 प्रकार; अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी म्हणाल्या – ‘गृहिणींकरीता विविध प्रकारचे महोत्सव ही अनोखी पर्वणी’

 

Related Posts