IMPIMP

Pune Crime | पुणे : पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप

by nagesh
 Pune Crime | Bail granted to accused in Gram Panchayat fraud case by forging letterpad, stamp and Sarpanch signature

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | कौटुंबिक वादातून पत्नीचा खून केल्याप्रकरणी एकाला न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी जन्मठेप आणि 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विनोदकुमार केहरसिंग बंजारा (35, रा. कासार अंबोली, मुळशी. मुळ रा. उत्तरप्रदेश) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विनोदकुमारने दि. 19 फेब्रुवारी 2017 रोजी कासार अंबोली येथे कौटुंबिक वादातून डोक्यात टिकाव मारून पत्नी सुनितादेवी बंजारा (28) हिचा खून केला होता. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस दलामधील पौड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विनोदकुमार आणि त्याची पत्नी सुनितादेवी हे वीटभट्टीवर काम करत होते. सुनितादेवीच्या खूनप्रकरणी वीटभट्टीमालक रमेश बंडू कांबळे (60, रा. कासारअंबोली) यांनी फिर्याद दिली होती. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी बाजू मांडली तर तत्कालीन पोलिस निरीक्षक मनोज यादव आणि उपनिरीक्षक एन.एस. मोरे यांनी गुन्हयाचा तपास केला होता. (Pune Crime)

 

न्यायालयीन कामकाजात सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) बी.बी. कदम, विद्याधर निचित, सहाय्यक निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी मदत केली. साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने विनोदकुमारला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Pune Court News)

 

 

Web Title :-  Pune Crime | pune court life imprisonment to husband for wife murder court news

 

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | शरद पवारांना जाणता राजा म्हणणारच, छगन भुजबळांचे विरोधकांना प्रत्युत्तर

Mumbai Crime | ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची डॉक्टर तरुणीला धमकी, बीएमसीच्या MBBS डॉक्टरला अटक

Supriya Sule | सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या ‘राजकारणात सक्रिय महिलांबाबत…’

 

Related Posts