IMPIMP

Supriya Sule | सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या ‘राजकारणात सक्रिय महिलांबाबत…’

by nagesh
Supriya Sule | women in politics are being talked about very badly these days supriya sule expressed  regret

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने महागाई विरोधात सुरू करण्यात आलेल्या जनजागर यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. महिलांबद्दलचे धोरण तसेच राजकीय आरक्षण व अन्य निर्णय घेतल्याबद्दल कृतज्ञता म्हणून पवार यांचा फुले पगडी, घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राजकारणातील खंत व्यक्त केली. राजकारणात सध्या महिलांबाबत अत्यंत वाईट बोललं जातयं असं त्या म्हणाल्या. (Supriya Sule)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी बोलताना त्या (Supriya Sule) म्हणाल्या, ‘महिलांबाबत बोलण्यात सध्या कुणीही मागे नाही. एक बोलला की लगेच दुसरा त्याच्या पुढे बोलतो. हे सर्व उबग आणणारे आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आणि जर हे असेच सुरू राहिले तर भविष्यात कोणाच्याही घरचे आपल्या घरातील महिलेला राजकारणात प्रवेश करू देणार नाहीत. त्यामुळे आपण आज निर्धार करू की आपला पक्ष कोणत्याही महिलेबाबत कधीही वाईट उद्गार काढणार नाही. याबाबतचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसनेच ठरवायला हवे अशी मागणी मी अध्यक्षांकडे करते असे सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या. तसेच याबाबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी यावेळी बोलताना राजकारणातील महिलांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्यांचा
चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या, कोणी काय घालायचे, कोणावर प्रेम करायचे,
कोणाबरोबर लग्न करायचे हे आता सरकार सांगू लागले आहे.
त्यांना थांबविण्यासाठी आपण आता रस्त्यावरची लढाई सुरू करतो आहे. असे विद्या चव्हाण म्हणाल्या.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Supriya Sule | women in politics are being talked about very badly these days supriya sule expressed  regret

 

हे देखील वाचा :

MP Vinayak Raut | ‘ज्या-ज्या पक्षाने मोठं केलं, त्यांना…’, ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला देणाऱ्या दीपक केसरकरांवर विनायक राऊतांचे टीकास्त्र

Rohit Pawar | ‘#जी’ वरून चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहित पवार यांच्यात रंगलं ट्वीटरवॉर

Chandrashekhar Bawankule | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्विटवरुन चंद्रशेखर बावनकुळे संतापले, म्हणाले- ‘इतका नीचपणा…’ (व्हिडिओ)

 

Related Posts