IMPIMP

Pune Crime | गांजा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 4 लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारासह (Pune Criminals) त्याच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotic Cell, Pune) दोनच्या पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून 21 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजासह (Marijuana) 4 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विष्णु उद्धव उपगंडले (Vishnu Uddhav Upgandale), अदित्य विलास पवार (Aditya Vilas Pawar), प्रसाद महादेव केमसे (Prasad Mahadev Kemse) असे अटक केलेल्या आरोपींची (Pune Crime) नावे आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी पोलीस नाईक संदीप शेळके (Police Naik Sandeep Shelke) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विष्णु उद्धव उपगंडले (वय-29 रा. हनुमाननगर, कोथरुड), अदित्य विलास पवार (वय-19 रा. केळेवाडी, कोथरुड), प्रसाद महादेव केमसे (वय-19 रा. राऊतवाडी, कोथरुड) यांच्यावर एन.डी.पी.एस अॅक्ट (N.D.P.S. Act) कलम 8(क), 20(ब)(ii)(क), 29 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. यातील विष्णु उपगंडले हा सराईत गुन्हेगार आहे. ही कारवाई सोमवारी (दि.18) कोथरुड येथील चैतन्य हेल्थ क्लब (Chaitanya Health Club) जवळ करण्यात आली. (Pune Crime)

 

 

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कोथरुड येथील रामबाग कॉलनी जवळ काही व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस परिसरात आरोपींचा शोध घेत असताना एक टाटा टियागो कार Tata Tiago Car (एमएच 12 एनयु 2549) हि संशयित रित्या उभी असलेली दिसली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारच्या मागील सिटच्या खाली एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यात गांजा आढळून आला. पथकाने 4 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना कोथरुड पोलिसांच्या (Kothrud Police) ताब्यात दिले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे
(Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर
(Police Inspector Prakash Khandekar), पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी,
मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, संदिप शेळके, साहिल शेख, आझीम शेख, योगेश मांढरे, कांबळे,
जगदाळे, बास्टेवाड महिला अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Narcotic Cell arrests 3 for possession of marijuana 4 lakh 24 thousand confiscated

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | ‘हे तीन पक्षांचं सरकार…’; नारायण राणेंनी सांगितला ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहूर्त

Pune Police | अवैध धंद्यांची वसुली करणे पडले महागात, पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी निलंबीत

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts