IMPIMP

Pune Crime | कोंढवा येथील लॅविटेट आणि द ब्रेक रुम हॉटेलमधील हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा

by nagesh
Pune Crime | First, action was taken against the roof-top hotel, which had an illegal hookah bar and a hotel with a loud sound system.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime | कोंढवा येथील क्लोव्हर हिल प्लाझा (Clover Hill Plaza Kondhwa) इमारतीत असलेल्या दोन
हॉटेलमधील अवैध हुक्का बारवर (Hookah Bar) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security
Department) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) करुन दोन जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात
(Kondhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.1) लॅविटेट हॉटेल (Lavitate Hotel) व द ब्रेक रूम हॉटेल (The
Break Room Hotel) येथे करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना कोंढवा येथील लॅविटेट हॉटेल व द ब्रेक रुम हॉटेल मध्ये अवैध हुक्का बार सुरु असल्याची माहिती मिळाली. पथकाने पाळत ठेवून दोन्ही हॉटेलवर छापा टाकला असता त्याठिकाणी बेकायदेशीरपणे हुक्का बार सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणावरुन वेगवेगळ्या कंपनीचे हुक्क्याचे फ्लेवर व हुक्क्याचे साहित्य असा एकूण 65 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात (Pune Crime) देण्यात आले आहे.

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.

 

 

Web Title :-  Pune Crime | Pune Police Crime Branch raids hookah bars at Lavitate and The Break Room Hotel in Kondhwa

 

हे देखील वाचा :

MP Arvind Sawant | अरविंद सावंतांची शिंदे गटातील आमदारांवर जबरी टीका, म्हणाले – ‘या 40 आमदारांना गाडण्यासाठी…’

Kushal Badrike | कुशलच्या इंस्टाग्राम पोस्टखाली चाहत्याने एक खंत व्यक्त केली ; नक्की असं का म्हणालाय हा चाहता पाहा

Chandrakant Patil | मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता मिळणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

 

Related Posts