IMPIMP

Pune Crime | हॉटेल बॉटल फॉरेस्ट, हॉटेल ब्ल्यु शॅक मधील अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा, 10 जणांवर FIR

by nagesh
 Pune Crime | Pune Police Crime branch raids illegal hookah parlors in Hotel Bottle Forest, Hotel Blue Shack, FIR against 10 people

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे शहरातील मुंढवा परिसरात सुरु असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर (Illegal Hookah Parlor) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell, Pune) छापा टाकाला आहे. या कारवाईत पोलिसांनी (Pune Police) 10 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 78 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मुंढवा येथील घोरपडी रोडवरील हॉटेल बॉटल फॉरेस्ट (Hotel Bottle Forest) आणि हॉटेल ब्ल्यु शॅक (Hotel Blue Shack) याठिकाणी (Pune Crime) गुरुवारी (दि.15) केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी हॉटेल बॉटल फॉरेस्ट हॉटेल मालक रोहित किसन Hotel owner Rohit Kisan (वय-29 रा. घोरपडी गाव), हॉटेल व्यवस्थापक देवराम मांगिलाल जैन Devram Mangilal Jain (वय-32 रा. रविवार पेठ), वेटर सरोज लालमुखीया कुमार Saroj Lalmukhiya Kumar (वय-19 रा. पाषाण), गोविंद सुरेंद्र मुखीया Govind Surendra Mukhia (वय-19 रा. मुंढवा), पवन मुखीया जोगिंदर मखीया Pawan Mukhi Joginder Mukhia (वय-22 रा. मुंढवा) हे ग्राहकांना अवैधरीत्या हुक्का पुरवून त्याठिकाणी हुक्का बार चालवत होते. त्यांच्याकडून 33 हजार 300 रुपयांचे हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य जप्त करण्यात आले. (Pune Crime)

 

तसेच हॉटेल ब्ल्यु शॅक या हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत हॉटेल चालक अभय दिवाकर मिश्रा Abhay Diwakar Mishra (वय-41 रा. कुर्ला पश्चिम), ग्राहकांना सर्व्हिस देणारे अशोककुमार गौड Ashok Kumar Goud (वय-22 रा. धायरकर वस्ती, ताडीगुत्ता, पुणे), गोलु निहरी रामकुमार Golu Nihri Ramkumar (वय-20 रा. धायरकर वस्ती, पुणे, मुळ रा. उत्तर प्रदेश), बाबु कालु शेख Babu Kalu Shaikh (वय-28 रा. धायरकर वस्ती, पुणे मुळ रा. उडीसा),
भरत उत्तीमलाल कामत Bharat Uttimalal Kamat (वय-39 रा. धायरकर वस्ती, पुणे मुळ रा. बिहार)
यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे ग्राहकांना तंबाखुजन्य हुक्का पुरवत होते.
त्यांच्याकडून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईतील आरोपींवर मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale),
महिला सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर पोलीस अंमलदार संदिप जाधव, संतोष देशपांडे, संदिप शिर्के,
प्रविण उत्तेकर, चेतन गायकवाड, रेहाना शेख, विशाल दळवी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, मारुती पारधी, नितेश जाधव यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime branch raids illegal hookah parlors in Hotel Bottle Forest, Hotel Blue Shack, FIR against 10 people

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde | ‘माझी बायपास सर्जरी झाल्यानंतर एकाही ठाकरेंचा फोन नाही; मात्र एकनाथ शिंदे 3 वेळा भेटून गेले’

Eknath Shinde-Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी चालू पत्रकार परिषदेत केली एकनाथ शिंदेंच्या कानात कुजबूज, व्हायरल झाला व्हिडीओ

Deepak Kesarkar | ‘गरज पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत लढून शिंदे गटाला रोखू’ ! उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर दिपक केसरकर म्हणाले -‘आम्ही आधीपासूनच…’

 

Related Posts