IMPIMP

Eknath Shinde | ‘माझी बायपास सर्जरी झाल्यानंतर एकाही ठाकरेंचा फोन नाही; मात्र एकनाथ शिंदे 3 वेळा भेटून गेले’

by nagesh
Eknath Shinde | After my bypass surgery no one thackeray call me but cm eknath shinde meet me three times - vijay shivtare

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Shinde | माझी बायपास सर्जरी (Bypass Surgery) झाली, एकाही ठाकरेंनी मला फोनसुद्धा केला नाही.
पण, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तीनवेळा हॉस्पीटलला येऊन गेले. त्यामुळेच, अशी माणसे जेव्हा महाराष्ट्राचे नेतृत्व करतील, तेव्हा नक्कीच
महाराष्ट्राचे (Maharashtra) भले होईल, अशी थेट टीका शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी हा हल्लाबोल केला आहे.

 

पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतारे यांचे शिवसेना (Shivsena) सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शिवतारे म्हणाले हकालपट्टी काय मी स्वत: पत्रकार परिषद घेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवतारे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही. ते मुख्यमंत्री (Chief Minister) असताना अनेक मागण्यांचे पत्रे मी लिहिली. त्यावर काहीच निर्णय झाला नाही. उत्तरही दिले नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ज्यांनी 15 वर्ष मतदारसंघ बांधला त्यांना दुसर्‍या मतदारसंघातून लढा असा निरोप दिला जातो हा काय प्रकार आहे. संजय राऊतांची (Sanjay Raut) निष्ठा कुणाशी आहे हे जनतेला माहिती आहे. जे महाराष्ट्राला कळते ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना का कळत नाही? असा प्रश्नही शिवतारे यांनी विचारला.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचे कौतुक करताना शिवतारे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) आणि उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) अनेक नेते माझ्या संपर्कात आहेत. मी तर अशीच उडी मारली, पण सगळ्यांना तेवढी डेरिंग नसते. काही फरक पडत नाही. देवेनभाऊ जेथे आहे, एक कर्तबगार माजी मुख्यमंत्री, प्रचंड रिस्पेक्ट मला त्यांच्याबद्दल. रिझल्ट ओरिएन्टेड मॅन आहे.

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कौतुक करताना शिवतारे म्हणाले, फडणवीस यांच्यासोबत आता ग्रासरुटला वाढलेले दिघेंचे चेले, मी 10 वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे.
कार्यकर्त्यांना सांभाळणे, आमदारांना सांभाळणे, त्यांच्या गोष्टी बघणे, त्यांच्या सुख-दुखात सहभागी होणे हे त्यांच्याकडून शिकावे. (Eknath Shinde)

शिवसेना प्रवक्ते आणि नेते खासदार संजय राऊत यांच्या टीका करताना शिवतारे म्हणाले, मेडिकल टर्ममध्ये सिझोफ्रेनिया नावाचा एक रोग आहे.
सिझोफ्रेनिया आजाराचा जो माणूस असतो त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. हा आजार हुशार माणसालाच होतो.
ही माणसे अतिवाचाराच्या गर्तेत जातात. त्यातून त्यांना वेगवेगळे भास होतात.
गोव्यात आमच्याशिवाय सरकार होणार नाही हा भास त्यांना झाला. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) ते घेऊन गेले. आणि तिथे तमाशा झाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यावेळी फडणवीस म्हणाले होते, आमच्याशी यांची लढाई नाही. यांची लढाई नोटाशी आहे.
खरोखरच नोटापेक्षाही कमी मते मिळाली. नामुष्की झाली. त्यांना दुसरा भास झाला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर योगी सरकारला (Yogi Government) दाबू शकतो.
उत्तर प्रदेशात 139 उमेदवार उभे केले. सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले.
तिसरा भास झाला एक ना एक दिवस आम्ही दिल्ली काबीज करू आणि दिल्लीवर उद्धव ठाकरे पंतप्रधान म्हणून असतील.
चुकीच्या प्रकारे विचार करून प्रखरपणे ते बिंबवतात. त्यातूनच हा प्रकार झाला की काय असे वाटते, अशी टीका शिवतारे यांनी केली.

 

Web Title :- Eknath Shinde | After my bypass surgery no one thackeray call me but cm eknath shinde meet me three times – vijay shivtare

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde-Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी चालू पत्रकार परिषदेत केली एकनाथ शिंदेंच्या कानात कुजबूज, व्हायरल झाला व्हिडीओ

Deepak Kesarkar | ‘गरज पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत लढून शिंदे गटाला रोखू’ ! उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर दिपक केसरकर म्हणाले -‘आम्ही आधीपासूनच…’

PM Shinzo Abe | माजी PM शिंजो आबे यांच्या हत्येनंतर VVIP च्या 360 डिग्री सुरक्षेबाबत केंद्र सरकारने राज्यांना पाठवली नवी अ‍ॅडव्हायजरी

 

Related Posts