IMPIMP

Pune Crime | पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 8 पीडित महिलांची सुटका

by nagesh
Pune Pimpri Crime | Police Raid On A One Spa Sangvi Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | विमानतळ परिसरात स्पाच्या (Spa In Vimantal) नावाखाली वेश्या व्यवसाय (Prostitution Racket In Viman Nagar) सुरु असल्याचा भांडाफोड सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police Crime Branch Social Security Cell) केला असून 8 पिडीत महिलांची सुटका केली. पोलिसांनी (Pune Police) 9 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 3 जणांना अटक (Pune Crime) केली तर 6 जण फरार झाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई शुक्रवारी (दि.1) विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीतील सिंबॉयसिस कॉलेज (Symbiosis College) समोरील एटमॉस्फियर यूनिसेक्स हेअर अँड ब्युटी स्टुडिओ (Atmosphere Unisex Hair and Beauty Studio) येथे केली.

 

याप्रकरणी मॅनेजर हिना अकबरअली सय्यद Hina Akbar Ali Sayyad (वय-30 रा. साठे वस्ती, लोहगाव), सहायक मॅनेजर तालुजा उर्फ ताज इस्लाम अब्दुल वाहीद Taluja alias Taj Islam Abdul Waheed (वय-33 रा. विमाननगर), फारुख अहमद बुदुल अहमद Farooq Ahmed Budul Ahmed (वय-22 रा.विमाननगर) यांना अटक (Arrest) केली आहे. तर स्पा सेंटरचा मालक सुरेश बाबुलाल परदेशी Suresh Babulal Pardeshi (रा. सुंदर हाईटस, कसबा पेठ), संदीप शरदचंद्र सहस्त्रबुद्धे Sandeep Sharadchandra Sahastrabuddhe (रा. काळेवाडी), जागा मालक अविनाश भाऊसाहेब साकोरे (Avinash Bhausaheb Sakore), भाऊसाहेब जी साकोरे (Bhausaheb G Sakore), बडा साहाब नावाचा व्यक्ती यांच्यावर पिटा कायद्यांतर्गत (Pita Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंबॉयसिस कॉलेज समोरील एटमॉस्फियर यूनिसेक्स हेअर अँड ब्युटी स्टुडिओ येथे मसाज स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार डमी ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी असलेल्या मुलींकडून मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली जादा रक्कम घेऊन वेश्याव्यवसाय केला जात होता. या कारवाईत 8 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. कारवाईत रोख रकमेसह 1 लाख 61 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, निलम शिंदे,
पोलीस अंमलदार इरफान पठाण, हणमंत कांबळे यांच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त,
पुणे शहर यांचे आदेशानुसार या कारवाईसाठी परीविक्षाधिन पोलीस उप निरीक्षकांनी देखील आपला सहभाग नोंदवला.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Social Security Cell Raid On Spa Massage Parlour Vimannagar Police Station

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | ‘उद्धव ठाकरे आमचे नेते, त्यामुळेच…’; दीपक केसरकरांच्या विधानाने चर्चांना उधाण

Alia Bhatt Baby Bump | आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो, ग्लॅमरस फोटो शेअर करून लपवला बेबी बंप…

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts