IMPIMP

Pune Crime | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घराबाहेरील झाडाच्या फांद्या तोडणे पडले महागात, दोघांविरुद्ध FIR

by nagesh
Ajit Pawar | send ajit pawar in pakistan says bjp former mla narendra pawar over statement sambhaji maharaj is not dharmveer

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या घराबाहेरील झाडाच्या फांद्या (Tree Branches) तोडणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. अजित पवारांच्या सोसायटी कंपाऊंडच्या बाहेर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्याप्रकरणी बारामतीत दोन जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे निसर्गप्रेमी (Nature Lover) आहेत. अजित पवारांचे झाडांवर प्रचंड प्रेम आहे. ते आपल्या भाषणातून झाडे लावण्याचा आणि निसर्ग जपण्याचा सल्ला नेहमीच देत असतात. मात्र अजित पवारांचे हे वृक्षप्रेम काहीजण विसरले आणि आता त्याचा फटका त्यांना बसला आहे. (Pune Crime)

 

अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या (Sahyog Society Baramati) कंपाऊंडच्या बाहेर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्यामुळे दोघांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष वाबळे (Santosh Wabale) यांनी वृक्षांच्या फांद्यांची तोड केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

 

बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक (Police Inspector Sunil Mahadik) यांनी सांगितले की,
दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थानी कंपाऊंडच्या आत असलेल्या झाडांच्या फांद्या या कंपाऊंड बाहेर आल्या होत्या.
फांद्यांची तोडणी सुरु असल्याचे फिर्यादी संतोष वाबळे यांच्या लक्षात आले.
त्यांनी कुणाच्या परवानगीने झाडं तोडत आहात अशी विचारणा केली.
त्यावर दिलीप जगदाळे (Dilip Jagdale) यांच्या सांगण्यावरुन तोडत असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
यावेळी त्यांच्याकडे झाडे तोडण्याचा परवाना आहे किंवा परवानगी आहे का असे विचारले. मात्र झाडे तोडणाऱ्यांकडे परवानगी नव्हती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तसेच काहीजण हे फांद्या घेऊन जाताना दिसले.
त्यावेळी झाडे तोडणाऱ्यांनी तोपर्यंत फायकस जातीच्या झाडाच्या (Phycus Tree) 20 ते 25 फांद्या तोडल्याचे आढळून आले.
त्यानंतर संतोष वाबळे यांनी पांडुरंग माने (Pandurang Mane) आणि दिलीप जगदाळे यांच्या विरोधात बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी चोरीचा (Theft) तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम (Maharashtra (Urban Area) Tree Protection and Preservation Act)  1975 चे कलम 21 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | pune rural police baramati registered case against two people for cutting branches of tree outside ncp leader ajit pawar house

 

हे देखील वाचा :

BJP Leader On Thackeray Government | ‘अनेक आमदार मुख्यमंत्री ठाकरेंवर नाराज; 20 जूनला दिसेल देवेंद्र फडणवीसांचा चमत्कार’; भाजप नेत्याचा दावा

Instant Loan On WhatsApp | आता WhatsApp वर मिळेल ताबडतोब कर्ज, कागदपत्रांची सुद्धा नाही गरज; जाणून घ्या प्रोसेस

MIM MP Imtiyaz Jaleel | ‘पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढल्यास महाराष्ट्रात भूकंप येईल, गरज पडली तर…’ – इम्तियाज जलील

 

Related Posts