IMPIMP

Pune Crime | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; सव्वा तीन लाखांचे दागिनेही नेले चोरुन

by nagesh
Pune Crime | 20 year old women rape by friend at house party accused arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका तरुणाने नागपूरच्या (Nagpur News) महिलेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिला पुण्यात बोलावून तिला लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या पर्समधील ३ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी नागपूर येथे राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, समीर बेगमपूरे (रा. पुणे, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. फिर्यादी या ५ जुलै २०२१ मध्ये आल्या होत्या. समीर याने त्यांना कात्रज (Katraj News) येथील हॉटेल राज येथे नेले. तेथे ते ६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत होते. या दरम्याने समीर याने त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यानंतर त्यांच्या नकळत त्यांच्या पर्समधील ३ लाख २५ हजार रुपयांचे १०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ न शकल्याने शेवटी त्यांनी तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक ढमे अधिक तपास करीत (Pune Crime) आहेत.

 

Web Title: Pune Crime | Rape in Pune for marriage; He also stole jewelery worth Rs

 

हे देखील वाचा :

Policeman Murder News | पोलीस हवालदाराच्या डोक्यात खलबत्ता घालून खून

Pune Crime | चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 3 लाखांचा ऐवज केला लंपास

Sovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने विकणार सरकार, 10 जानेवारीपासून सुरू होणार ‘सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम’

Corona Vaccination in India | देशात लसीकरणाचा 150 कोटींचा टप्पा पार; पंतप्रधानांनी मानले देशवासीयांचे आभार

 

Related Posts