IMPIMP

Corona Vaccination in India | देशात लसीकरणाचा 150 कोटींचा टप्पा पार; पंतप्रधानांनी मानले देशवासीयांचे आभार

by nagesh
PM Narendra Modi | conspiracy to assassinate pm narendra modi by underworld don dawood henchmen unknown audio message on mumbai traffic police mobile

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Corona Vaccination in India | कोरोनाच्या संकटामुळे (Coronavirus) कौटुंबिक, आर्थिक मोठं नुकसान झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तर काही जण मरणाच्या दारातून परत आले. एक नाहीतर गेल्या दोन अडीज वर्षांपासून हे कोरोनाचे भयंकर रूप सर्वजण पाहत आहेत. संसर्ग आटोक्यात आणण्याचे आव्हान केवळ प्रशासनच नाही तर लोकांसमोरही आहे. मात्र, या लढ्यात लसीकरणाचे अस्त्र देशाला मिळालं. अन् कोरोनाशी दोन हात करण्यास सुरुवात झाली. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम (Corona Vaccination in India) राबवण्यात आली. या मोहिमेने मोठा टप्पा पार केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शुक्रवारी लसीकरण मोहिमेने 150 कोटींचा टप्पा पूर्ण केला. देशातल्या प्रत्येक गावागावात लसीकरण मोहीम राबवल्याने तसेच लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला त्यामुळेच हा टप्पा गाठला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ट्विट करता देशवासियांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी एक आवाहनही केलं. (Corona Vaccination in India)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात की, ‘लसीकरण आघाडीवर एक उल्लेखनीय दिवस.. 150 कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन. लसीकरण मोहिमेने अनेकांचे प्राण वाचले. आपण सर्व जण यापुढेही कोरोना नियमांचे पालन करू. ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचा देश आभारी आहे. आमचे डॉक्टर, शास्त्रज्ञ, नवोदित आणि लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. अजूनही काही जणांचे लसीकरण राहिले आहे. त्या पात्र नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन करत चला एकत्र कोरोनाचा सामना करू,’ असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

 

Web Title : Corona Vaccination in India | pm narendra modi covid 19 vaccination in india tweet

 

हे देखील वाचा :

Lockdown in Maharashtra | महाराष्ट्रात Lockdown की कडक निर्बंध? CM उद्धव ठाकरे घेणार निर्णय

Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील 141 पोलिसांना कोरोनाची लागण; विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाईस सुरुवात, 2 दिवसात दीड हजारांवर कारवाई

Pune Crime | बहिणीला दिली पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी ! तिने घेतले 1 कोटी 40 लाखांचे कर्ज; रेलिगेर फिनवेस्ट लि. विरूध्द गुन्हा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

 

Related Posts