IMPIMP

Sovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने विकणार सरकार, 10 जानेवारीपासून सुरू होणार ‘सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम’

by nagesh
SGB Scheme | sovereign gold bond scheme open from 19 december know details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sovereign Gold Bond Scheme | मोदी सरकार (Modi Government) जनतेला स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 च्या अकराव्या मालिकेची विक्री 10 जानेवारी 2022 पासून सुरू होत आहे. ही योजना फक्त पाच दिवसांसाठी (10 ते 14 जानेवारी) खुली आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. सॉवरेन गोल्ड बाँड सरकारच्या वतीने आरबीआय जारी करते. (Sovereign Gold Bond Scheme)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सरकारी गोल्ड बाँड योजनेच्या 2021-22 च्या नवीन मालिकेसाठी 4,786 रुपये प्रति ग्रॅम इश्यू प्राईस ठरवली आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजना सोमवारपासून सुरू होणार असून 14 जानेवारीपर्यंत खरेदी करता येईल.

ऑनलाइन खरेदीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट
ऑनलाइन अर्ज करणार्‍या आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरणार्‍या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट दिली जाईल. अशा गुंतवणूकदारांना ही गोल्ड बाँड योजना 4,736 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने मिळेल.

 

कोठे खरेदी करू शकता सॉवरेन गोल्ड बाँड?
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे सॉवरेन गोल्ड बाँड सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे विकले जातील. ते स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँकांमध्ये विकले जात नाहीत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कमाल मूल्य 4 किलोपर्यंत बॉण्ड खरेदी मर्यादा
सॉवरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलोचे गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकते.
त्याच वेळी, किमान एक ग्रॅम गुंतवणूक असणे आवश्यक आहे. तसेच, ट्रस्ट किंवा तत्सम संस्था 20 किलोपर्यंतचे रोखे खरेदी करू शकतात. अर्ज किमान 1 ग्रॅम आणि त्याच्या पटीत जारी होतात.

 

 

Web Title :- Sovereign Gold Bond Scheme | sovereign gold bond scheme opens on january 10 issue price other details

 

हे देखील वाचा :

Corona Vaccination in India | देशात लसीकरणाचा 150 कोटींचा टप्पा पार; पंतप्रधानांनी मानले देशवासीयांचे आभार

Lockdown in Maharashtra | महाराष्ट्रात Lockdown की कडक निर्बंध? CM उद्धव ठाकरे घेणार निर्णय

Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील 141 पोलिसांना कोरोनाची लागण; विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाईस सुरुवात, 2 दिवसात दीड हजारांवर कारवाई

 

Related Posts