IMPIMP

Pune Crime | तुझ्यामुळे अपघात झाल्याचे सांगून तरुणाला लुटले; पुणे-सातारा रोडवरील घटना

by nagesh
 Kolhapur Crime News | 32 year old son went to sleep on the mountain after attacking his parents in the house

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | तुझ्याकडून मागे दोन अपघात (Accident) झाले आहेत. त्या अपघातांची नुकसानभरपाई म्हणून 40 हजार रुपये दे, असे म्हणत तीन चोरट्यांनी एका तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून (Looted by Threatening) लुटले. चोरट्यांनी तरुणाकडून 40 हजार रुपये घेतले. ही घटना (Pune Crime) शनिवारी (दि.10) रात्री दहा ते अकरा यादरम्यान पुणे सातारा रोड (Pune Satara Road) आणि लक्ष्मीनारायण थिएटरजवळ (Laxminarayan Theatre) घडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत केतनकुमार वसंतराव होवाळ (वय 30, रा. शोभा निवास, संतोषनगर, कात्रज) याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) रविवारी (दि.11) तक्रार केली आहे. पोलिसांनी एमएच 12 पीएल 0325 दुचाकीवरील दोन जण आणि आणखी एका दुचाकीवरील एक व्यक्ती यांच्याविरुद्ध आयपीसी 394, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामावरून घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून
आलेल्या टोळक्याने त्यांना आडवले. तुझ्यामुळे मागे दोन अपघात झाले आहेत.
अपघाताची भरपाई म्हणून चाळीस हजार रुपये दे, नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल,
अशी धमकी चोरट्यांनी दिली. चोरट्यांनी फिर्यादी यांना धमकावून त्यांच्या मित्राकडून ऑनलाइन 40 हजार
रुपये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी एटीएममधून 20 हजार रुपये काढून घेतले,
तर 20 हजार रुपये जबरदस्तीने आरोपीच्या फोन पे अकाउंटवर जमा करून घेतले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Robbed the young man saying that the accident happened because of you; Incident on Pune-Satara Road

 

हे देखील वाचा :

Rohit Shetty | दिग्दर्शक रोहित शेट्टीने केले समृद्धी महामार्गाबद्दल ‘हे’ मोठे वक्तव्य

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार

Pune Crime | सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ व्यावसायिकाला घातला 11 लाखांचा गंडा

 

Related Posts