IMPIMP

Pune Crime | जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालकाला लुटले

by nagesh
Pune Crime | Robbery ON Jangali Maharaj Road Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | नेहमी वाहता असणारा आणि पुणेकरांचे आकर्षण असलेल्या जंगली महाराज रस्त्यावर (JM Road Pune) एका मोटारसायकलचालकाला अडवून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत नील जैन (वय २५, रा. घोरपडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात ( गु. रजि. नं. ५०/२२) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन हे २९ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता मोटारीने जात होते. त्या वेळी त्यांच्यापुढे एक दुचाकीस्वार वेडीवाकडी दुचाकी चालवित होता (Pune Crime). जैन याने त्याला जाब विचारला. त्यानंतर दुचाकीस्वाराने काही अंतरावर गंधर्व हॉटेलसमोरील रोडवर मोटार अडवली. मोटारचालक जैन याला धमकावले. त्याला मारहाण करुन मोटारीत ठेवलेली पाच हजारांची रोकड व गाडीची चावी जबरदस्तीने लुटून दुचाकीस्वार पसार झाला. जंगली महाराज रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरु असल्याने गर्दी असते. असे असताना बालगंधर्व पोलीस चौकीपासून काही अंतरावर हा प्रकार घडला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Robbery ON Jangali Maharaj Road Pune

 

हे देखील वाचा :

Lifestyle After 40 | वयाच्या चाळिशीनंतर करा राहणीमानात ‘हे’ 5 बदल, जाणून घ्या

Chickenpox | ‘या’ हंगामात चिकनपॉक्स संसर्गाचा धोका वाढतो; जाणून घ्या त्याची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग

Rashmika Mandanna Oops Moment | हात वर करताच जे नको तेच दिसलं, रश्मिका मंदान्ना झाली Oops Moment ची शिकार…

 

Related Posts