IMPIMP

Pune Crime | मुली झाल्याने वंशाच्या दिव्यासाठी केला दुसरा विवाह; हडपसरमध्ये पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Mangesh Kanchan arrested by Loni Kalbhor police for threatening two doctors and demanding Rs 30 lakh ransom

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | वंशाला दिवा हवा, हा पूर्वांपार समज अजूनही लोकांच्या मनात खोलवर रुजला आहे. त्यातून मुलगी झाल्यास विवाहितेचा छळ करण्याचा प्रकार सर्वत्र दिसून येतो. अनेक जण वैद्यकीय कारणाकडे दुर्लक्ष करुन वंशाला दिवा हवा, म्हणून पहिल्या पत्नीला वार्‍यावर सोडून दुसरा विवाह करतात. असाच दुसरा विवाह करुन पहिल्या पत्नीचा छळ करणार्‍या 7 जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विशाल खोपडे, अशोक खोपडे, रोहिणी खोपडे, केतन खोपडे, प्राजक्ता विशाल खोपडे, वृषाली मोडवे,
विजय मोडवे (रा. बोडकेनगर, जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका
विवाहितेने फिर्याद दिली आहे. छळाचा हा प्रकार 8 फेब्रुवारी 2014 ते 13 जानेवारी 2021 दरम्यान सुरु होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिलांनी लग्नात सर्व मानपान करुनही सासरच्याकडील लोकांनी त्यांच्या वाढीव मागणीप्रमाणे सोने, दागिने, पैसे न दिल्याने फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ करुन क्रूर वागणूक दिली. तसेच तिला मुलगी झाल्याने घटस्फोट मागितला. तो न दिल्याने तिचा छळ सुरुच राहिला. या छळाला कंटाळून फिर्यादी माहेरी परत आल्या. तिचे स्त्रीधन परत न देता विशाल खोपडे याने दुसरा विवाह केला. त्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Second marriage for a son born of daughters; Case registered against 7 persons including husband in Hadapsar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण, मारहाण करून लुटले; महिलेसह दोघांवर गुन्हा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 244 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी

PMGY | PM मोदींनी तरूणांच्या रोजगारासाठी बनवला विशेष ‘प्लान’, 100 लाख कोटींच्या गतिशक्ती योजनेची घोषणा

 

Related Posts