IMPIMP

Pune Crime | सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण, मारहाण करून लुटले; महिलेसह दोघांवर गुन्हा

by nagesh
Pune Crime | lover do wrong things in girl house of hadapsar police station area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन घरात शिरुन लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे ताब्यात घेऊन ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करुन मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) एका महिलेसह दोघांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी हवेली तालुक्यातील कोरेगाव मुळ गावातील एका 62 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्याच इमारतीत राहणारी रेश्मा शेख व एक जण 12  ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या घरात शिरले. आम्ही सीबीआयचे अधिकारी असल्याची त्यांनी बतावणी केली. घरातील लॅपटॉप, मोबाईल, मोटारीचे स्टार्टर, कागदपत्रे व बँकेचे कागदपत्रे असा 31 हजार रुपयांचा माल घेतला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने गाडीत बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दमदाटी करुन आम्हाला दीड लाख रुपये द्या नाही तर तुमच्यावर खोटी केस करतो. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना खेड शिवापूर येथे सोडून ते पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Kidnapping, beating and robbing a senior citizen claiming to be a CBI officer; Crime on both, including the woman

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 244 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी

PMGY | PM मोदींनी तरूणांच्या रोजगारासाठी बनवला विशेष ‘प्लान’, 100 लाख कोटींच्या गतिशक्ती योजनेची घोषणा

PM Modi | 75 आठवड्यात 75 वंदे भारत ट्रेन, सैनिकी शाळांमध्ये मुलींना सुद्धा प्रवेश; लाल किल्ल्यावरून PM मोदी यांनी केल्या ‘या’ 10 मोठ्या घोषणा

 

Related Posts