IMPIMP

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार शुभम ऊफाळे एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 68 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील (Pune Crime) सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 68 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार शुभम सचिन ऊफाळे Shubham Sachin Ufale (वय – 21 रा. हिंगने खुर्द, साई नगर, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Pune Criminals) नाव आहे. शुभम ऊफाळे याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात (Aurangabad Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

शुभम ऊफाळे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) असून त्याने त्याच्या साथीदारांसह सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, चाकु, लोखंडी रॉड या सारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दुखापत, दंगा (Riots), दरोड्याचा प्रयत्न (Attempted Robbery), बेकायदा हत्यार (Weapon) बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे (FIR) केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 03 गुन्हे दाखल आहेत.

 

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुभम ऊफाळे याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख (Senior Police Inspector Yusuf Sheikh),
पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलीस आयुक्तांनी पुणे शहरात दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई (Preventative Action) करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
आजपर्यंत 68 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Shubham Uphale a notorious criminal from Pune is lodged for one year Under MPDA CP Amitabh Guptas action against 68 people under MPDA Act

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोथरुड परिसरात दुकान चालविण्यासाठी दररोज 1 हजारांची खंडणी; कोयत्याचा धाक दाखवून गुंडांनी गल्ल्यातील रोकड नेऊन दुकानाचा बोर्ड जाळला

Pune Crime | वीज बील भरण्यासाठी QR Coad पाठवून ज्येष्ठ नागरिकाला पावणेदहा लाखांना गंडा; वैयक्तिक मोबाईलवरुन केलेल्या संपर्काला प्रतिसाद न देण्याचे आवाहन

Pune Crime | बँक मॅनेजरशी संगनमत करुन आईने मुलगा, मुलीला घातला साडेचौदा लाखांना गंडा; लोकमान्यनगरमधील घटना

 

Related Posts