IMPIMP

Pune Crime | वीज बील भरण्यासाठी QR Coad पाठवून ज्येष्ठ नागरिकाला पावणेदहा लाखांना गंडा; वैयक्तिक मोबाईलवरुन केलेल्या संपर्काला प्रतिसाद न देण्याचे आवाहन

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | महावितरणचा अधिकारी (Mahavitaran Officer) असल्याने सांगून वीज बील (Light Bill) भरण्यासाठी क्युआर कोड पाठवून त्याद्वारे सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ९ लाख ७९ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील मीरानगर पार्क सोसायटीत (Meera Nagar Park Society) राहणार्‍या एका ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५१/२२) दिली आहे. हा प्रकार ८ जून रोजी सायंकाळी सात ते ९ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर सायबर चोरट्याने (Pune Cyber Crime) प्रथम वीज बिल भरण्याबाबत मेसेज पाठविला. त्यानंतर त्यांना फोन करुन आपण महावितरणचा अधिकारी आयुश कुमार असल्याचे सांगितले. त्यांना वीजबील भरण्यासाठी क्युएस नावाचे अ‍ॅप पाठवून ते डाऊनलोड व इन्स्ट्रॉल करायला सांगितले. त्याबरोबर त्यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस सायबर चोरट्याकडे गेला. त्यानंतर त्याने या ज्येष्ठ नागरिकाच्या चालू खात्यातून ४ लाख ८९ हजार ५३१ रुपये आणि ४ लाख ८९ हजार ५३१ रुपये असे ९ लाख ७९ हजार ६२ रुपये ट्रान्सफर करुन घेऊन फसवणूक (Fraud Case) केली आहे.

वीज ग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरुन बनावट एसएमएस पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधायला सांगणे,
त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व
याप्रकारे वीज ग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहे.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरुन प्राप्त झालेल्या बनावट एस एमएस ना कोणताही प्रतिसाद देऊ नये,
असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | QR Coad Mahavitaran MSEB Light Bill Cheating Fraud Case Koregaon Park Police Station Meera Nagar Park Society

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बँक मॅनेजरशी संगनमत करुन आईने मुलगा, मुलीला घातला साडेचौदा लाखांना गंडा; लोकमान्यनगरमधील घटना

Pune Crime | ‘एक्स्ट्रा सर्व्हिस’ च्या नावाखाली मसाज पार्लरमध्ये सुुरु होता वेश्या व्यवसाय; कोरेगाव पार्कमधील गोल्डन ओक स्पावर छापा, मॅनेजरच होता झीरो पोलीस

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यामध्ये (DA) 5 टक्के वाढ निश्चित; जाणून घ्या

 

Related Posts