IMPIMP

Pune Crime | बँक मॅनेजरशी संगनमत करुन आईने मुलगा, मुलीला घातला साडेचौदा लाखांना गंडा; लोकमान्यनगरमधील घटना

by nagesh
Pune Crime | Pune Municipal Corporation PMC recruitment 2022 Cheating Graud Case News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मुलगा आणि मुलीचे बँक खात्याचे चेक (Bank Account Checks) चोरुन त्यावर बनावट सह्या (Bogus Signature) करुन आईनेच बँक मॅनेजरशी संगनमत (Conspiracy) करुन १४ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी लोकमान्यनगर (Lokmanya Nagar Pune) येथे राहणार्‍या एका २१ वर्षाच्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८७/२२) दिली आहे. त्यानुसार फिर्यादीची आई व बँक मॅनेजर गौरव गिरीश लोणकर Gaurav Girish Lonakar (वय ३१, रा. नर्‍हे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बँक ऑफ बडोदाच्या (Bank Of Baroda) सदाशिव पेठ (Sadashiv Peth Pune) शाखेत १८ मे २०२१ रोजी घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या आई व बहिणीसह लोकमान्यनगर येथे राहतात.
फिर्यादी व त्यांच्या बहिणीचे बँक ऑफ बडोदाच्या सदाशिव पेठ शाखेत खाते आहे.
त्यांच्या आईने फिर्यादी यांचे दोन चेकवर प्रत्येकी ५ लाख रुपये व बहिणीच्या चेकवर ४ लाख ५० हजार रुपये अशी रक्कम टाकून त्यावर बनावट सह्या केल्या.
त्या खर्‍या आहेत, असे भासवून परस्पर बँकेतून ही रक्कम काढून त्याचा अपहार केला.
फिर्यादीची आई व बँक मॅनेजर यांनी दोघांची फसवणूक केली.
न्यायालयाच्या (Pune Shivaji Nagar Court) आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Cheating Fraud Case Bogus Signature Conspiracy With Bank Manager Of Bank Of Baroda Vishrambaug Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘एक्स्ट्रा सर्व्हिस’ च्या नावाखाली मसाज पार्लरमध्ये सुुरु होता वेश्या व्यवसाय; कोरेगाव पार्कमधील गोल्डन ओक स्पावर छापा, मॅनेजरच होता झीरो पोलीस

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यामध्ये (DA) 5 टक्के वाढ निश्चित; जाणून घ्या

Bajaj e Scooter Chetak | बजाज दरमहिना 5000 ‘ई-स्कूटर चेतक’ बनवणार, पुण्यात नवीन प्रॉडक्शन लाईनमध्ये उत्पादन सुरू

 

Related Posts