IMPIMP

Pune Crime | सोसायटीच्या CCTV कॅमेर्‍याचा ‘अ‍ॅगल’ महिलेच्या बेडरूमच्या खिडकीवर, खासगी कपड्यातील प्रायव्हेट चित्रीकरण पाहणार्‍या चेअरमन, सेक्रटरी, खजिनदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Former bjp corporator Dhananjay Jadhav beats msedcl official who came collect overdue electricity bill dattawadi police station

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सोसायटीतील तळमजल्यावर राहणार्‍या महिलेच्या बेडरुमच्या खिडकीत सोसायटीचे CCTV कॅमेरा लावून बेडरुममध्ये काय चालले आहे हे तब्बल एक महिनाभर तिघे जण पहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (hinjewadi police) या सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदार यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा (molestation case) दाखल केला (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

हा प्रकार हिंजवडी-वाकड रोडवरील (pune hinjewadi road wakad) एका सोसायटीत ५ ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही महिला सोसायटीत तळमजल्यावर राहते.
फिर्यादी यांना माहिती होऊ न देता त्यांच्या परवानगीशिवाय त्या रहात असलेल्या फ्लॅटच्या बेडरुमच्या खिडकीकडे तोंड करुन बेडरुममध्ये काय चालले आहे हे पाहण्याच्या उद्देशाने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसविला.

त्याद्वारे फिर्यादी या बेडरुममध्ये प्रायव्हेट कपड्यांवर वावरत असताना त्याचे या पदाधिकार्‍यांनी चित्रिकरण करुन ते त्यांनी पाहिले आहे.
त्यानंतर फिर्यादी यांना या कॅमेर्‍याबाबत समजल्यावर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास सांगितला.
त्याला पदाधिकार्‍यांनी नकार दिला. फिर्यादी यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे ५ ते २८ सप्टेंबर दरम्यान पाळत ठेवून त्यांचे खासगी कपड्यातील चित्रीकरण केले.
म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दहिफळे तपास (Pune Crime) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Society’s CCTV camera molestation case against chairman, secretary, treasurer for watching private footage in private clothes of woman

 

हे देखील वाचा :

Mumbai High Court | मुलाच्या कल्याणासाठी त्याला त्याच्या आईजवळ ठेवणे स्वाभाविक! एका TV अभिनेत्रीला निर्देश देण्यास मुंबई हायकोर्टचा नकार

Hair beauty tips | ओल्या केसात कधीही करू नका या 7 चूका, होतील खराब, जाणून घ्या सविस्तर

Natural Gas | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दणका ! नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ

Equity Mutual Funds | ‘या’ 5 ‘इक्विटी फंडां’नी दिला 119 पट नफा ! 1 लाखाचे झाले 1.2 कोटी रुपये; जाणून घ्या

Pune accident | दुर्देवी ! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भीषण अपघात; आई-वडिलांसह 7 महिन्याच्या बाळाला कंटेनरने चिरडले

 

Related Posts